महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ.हेमलता चिंबुळकर
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : २८ मार्च,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ.हेमलता प्रभाकर चिंबुळकर यांची नुकतीच निवड करण्यात आली,असून त्यांना मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.
डॉ.हेमलता चिंबुळकर यांनी खालापूर तालुका महीला आघाडी अध्यक्ष पदाची जबाबदारी गेल्या अनेक वर्षापासून पार पाडली असून तालुक्यात महिला संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत, त्यांची या कामाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्रक मनसे नेते माजी आमदार नितीन सरदसाई यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे नेते शिरीष सावंत, महिला आघाडी कोकण प्रदेश अध्यक्षा स्नेहल जाधव, मनसे रायगड जिल्हा महिलासे सेना अध्यक्षा सपना राऊत, आदिती सोनार, रायगड जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील, देवेंद्र गायकवाड, संदेश ठाकूर, मनसे नेते जे पी पाटील, सचिन कर्णुक, खालापूर तालुका प्रमुख विजय सावंत, मनसे नेते अविनाश देशमुख, संदिप पाटील,मंदार जोशी, आदीसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments