राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे हे भावीच आमदार राहणार - जिल्हाप्रमुख संतोष भोईर

 राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे हे भावीच आमदार राहणार - जिल्हाप्रमुख संतोष भोईर 



पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २७ मार्च,

                  कर्जत खालापूर मतदार संघाचे पुढील २५  वर्ष आमदार हे महेंद्र थोरवे राहणार असून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे भावीच आमदार राहणार असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी केली आहे,
कर्जत खालापूर मतदार संघात राजकीय शिमगा पाहायला मिळत  असून राष्ट्रवादी शिवसेनेत कलगीतुरा पाहायला मिळाला आहे.
                 शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी  रायगड लोकसभेचे  उमेदवार  सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रतीउत्तर दिले असून शिवसेनेनेही राष्ट्रवादीला जशाच तसे उत्तर दिले आहे.
         कर्जत खालापूर मतदार संघात  आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात  विकासाची गंगा आणली असून येणाऱ्या पुढील  २५ वर्ष  आमदार हे महेंद्र थोरवे असणार असल्याचा दावा जिल्हाप्रमुख  संतोष भोईर यांनी केला आहे.
                येणाऱ्या रायगड  लोकसभेला आम्ही महायुतीच्या जो कोणी उमेदवार असेल त्यांचे  आम्ही काम करू मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळ लोकसभेला आमच्या उमेदवाराचे काम करावे लागेल अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल.
                 राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे हे  यांना  आतापासूनचे आमदारकीचे वेड  लागले  असून  गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, मात्र आम्हीही त्यांना उत्तर देण्यासाठी खंबीर आहोत, मग कळेल कोण कोणाला हत्तीच्या पायाखाली तुडवतो ते कळेल ? आम्हीही तयार आहोत येणाऱ्या विधान सभेला राजकीय कुस्ती होऊन द्या मग कळेल  कोणाचा कडेलोट होईल.
            कर्जत खालापूर मतदार संघाचे  पुढील २५  वर्ष आमदार  शिवसेनेचे महेंद्र थोरवेच असून सुधाकर घारे हे भावीच आमदार राहणार असल्याची टीका जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर