ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या रायगड जिल्हा प्रभारीपदी आनंदराव कचरे यांची निवड

 ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या रायगड जिल्हा प्रभारीपदी आनंदराव कचरे  यांची निवड 



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २८ मार्च,

              ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या रायगड जिल्हा प्रभारी पदी ज्येष्ठ समाज सेवक आनंदराव कचरे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे यांच्या हस्ते देण्यात आले  आहे.
               ऑल इंडिया धनगर महासंघाचे काम आणि प्रवीण काकडे यांचे विचार रायगड जिल्ह्यातील खेडोपाडी पोहचविण्याचे काम आनंदराव कचरे यांनी केले असून, समाजासाठी अहोरात्र काम करत आहेत.आनंदराव कचरे हे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष व संपर्क प्रमुख होते.त्यांनी त्यांच्या कालावधीत धनगर समाजातील गोर गरीब शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.तर समाजातील व्यक्तीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू त्यांना न्याय देण्यासाठी ऑल इंडिया धनगर महासंघाच्या माध्यमातून केले मोठे  योगदान दिले आहे.
              धनगर समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी,आणि समाजातील गोर गरीब विद्यार्थी शिकला तर समाजाची शैक्षणिक प्रगती होऊन आर्थिक विकास होईल यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे  हे महाराष्ट्रातील दऱ्या, खोऱ्यातील आणि वाड्या वस्त्यांवर पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन शाळेत विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. 
             त्यांनी समाजात शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.त्याचप्रमाणे आनंदराव कचरे हे रायगड जिल्ह्यात महत्वाची कामगिरी करत असून त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर  पुन्हा एकदा जिल्हाच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली असून त्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.कचरे यांची निवड झाल्याने त्यांचे  सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर