आत्करगाव येथे तीनहून अधीक गोधनाची कत्तल,गाभण गायीच गर्भ मिळाल मृतावस्थेत.

 आत्करगाव येथे तीनहून अधीक गोधनाची कत्तल,गाभण गायीच गर्भ मिळाल मृतावस्थेत.





पाताळगंगा न्युज : जयवंत माडपे 
खोपोली : २८ मार्च,

           खालापूर तालुक्यातील आत्करगाव नाक्यावरील क्रिकेटच्या मैदानावर शिवजयंतीच्या आधीच्या रात्री तीनहून अधिक गोधनाची हत्या करून मांस चोरी करण्याची घटना घडली असून ,यामध्ये गाभण गायीच अर्धवट वाढ झालेले गर्भ मृतावस्थेत सापडल्याने हलहल व्यक्त होत आहे.या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली आहे हिंदू संघटनांनी संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

                 खालापूर तालुक्यात गोधन हत्येच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे.सतत कुठेना कुठे आशा घटना घडत असताना, शिवजयंतीच्या पूर्व रात्रीला मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तीनहून अधिक गोधनाची हत्या करण्यात आळी आहे.शिवजयंतीच्या दिवशी दुपारी ही घटना ग्रामस्थाना समजल्या नंतर ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली.सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर खोपोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधत पोलिसांना बोलाविण्यात आले.घटनास्थळी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी भेट घेत घटनास्थलाची माहिती घेत घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद वस्तू आणि गोधनाच्या शरीराचे टाकलेल्या अवयवांचे नमुने पुढील तपासनिसाठी पाठविण्यात आले आहेत.

                 विशेष म्हणजे या ठिकाणी अर्धवट वाढ झालेल्या गाईचा गर्भ मृतावस्थेत सापडल्याने हलहल व्यक्त केली जात होती.याच दरम्यान घटना घडलेल्या स्थळावर जिल्हा परिषद माजी सभापती व भाजप नेते नरेश पाटील,संदीप पाटील, युवा मोर्चा नेते प्रसाद पाटील यांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यापूर्वीही अश्या घटना या परिसरात घडल्या असल्याने गोधनाच्या सुक्षिततेचा प्रश्न ऐरनिवर आला असल्यान ग्रामस्थांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.तर गोधन चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा आणि भविष्यात आशा घटना घडू नये यासाठी त्या गोधन चोरांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते नरेश पाटील व भाजपाचे माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी केली आहे.
                 यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील, माजी उपसरपंच संदीप पाटील,बजरंग दलाचे रुपेश मेस्त्री, भाजपचे युवा नेते प्रसाद पाटील, हेमंत पाटील यांसह मोठ्या संखेने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. हिंदू संघटनांनी या घटनेची चौकशी करण्यात यावी व संबंधितां वर योग्य ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर