मनसेच्या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहा - मनसे नेते नितीन सरदेसाई

 मनसेच्या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहा - मनसे नेते नितीन सरदेसाई 




पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २८ मार्च,

                   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याचा मेळाव्याच्या पूर्वतयारी ची बैठक नुकतीच  महड  येथे पार पडली असून या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने  पदाधिकारी  आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन  मनसे  नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केले आहे.
               महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्क मुंबई येथे दरवर्षी  गुढीपाडव्याला मेळावा  मोठ्या  उत्साहात साजरा होतो, त्याचप्रमाणे या वर्षीही ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा  आयोजित करण्यात आला असून मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले आहे.
                  देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
              या बैठकीला मनसे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई, मनसे नेते शिरीष सावंत कोकण संघटक महिला आघाडी अध्यक्षा स्नेहल जाधव, मनसे महिला मध्य रायगड जिल्हाध्यक्षा सपना राऊत, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, देवेंद्र, गायकवाड, संदेश ठाकूर, मनसे नेते जे पी पाटील, सचिन कर्णुक, खालापूर तालुका प्रमुख  विजय सावंत, अविनाश देशमुख, संदीप पाटील,  हेमलता चिंबुळकर , मंदार जोशी, आदीसह अनेक पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर