शिवजयंती निमित्ताने माजगांव ,आंबिवली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

 शिवजयंती निमित्ताने माजगांव ,आंबिवली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन 





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली : २९ मार्च,

               हिंदुचे अराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज  यांची जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन माजगांव,आंबिवली येथे करण्यांत आले.सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करुन  मशाल ज्योत उंबरखिंड येथे नेण्यांत आली.यावेळी आंबिवली येथिल तरुण वर्ग,महिला वर्ग युवक मोठ्या संख्येने उपस्थित असल्यांचे पहावयांस मिळाले.ही ज्योत घेवून जात असतांना तरुणांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद पहावयांस मिळत होता.डोक्यावर भगवी टोपी,मस्तकी चंद्रकोर अश्या वेशात शिव भक्त ही मशाल ज्योत घेवून रस्त्यावर धावत असल्यांचे पहावयांस मिळाले.
               


तसेच सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात,आणी फटाक्यांच्या अतिषबाजीत ही भव्य दिव्य अशी मिरवणुक काढण्यांत आली.यावेळी महिला वर्गांचा उत्साह औरच असल्यांचे पहावयांस मिळाले.यावेळी शिवपालखीचे प्रत्येक  महिला वर्गांनी पुजन करीत असल्यांचे पहावयांस मिळाले
           


   त्याच बरोबर आलेल्या सर्व शिव भक्तांना महाप्रसादाचे आयोजन तरुण वर्गांनी केले होते.रात्री महिला वर्गांसाठी होम मिनिस्टर तसेच लहान मुलांसाठी नृत्यांचे आयोजन करण्यांत आले होते.यावेळी या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाल्यांचे पहावयांस मिळाले या कार्यक्रमास मा.आमदार मनोहर भोईर यांनी शिवरायांचे दर्शन घेवून आंबिवली येथिल तरुण वर्गांचे कौतुक केले.यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 




Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर