माजगांव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह त्रीतपपुर्ती सोहळा

 माजगांव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह त्रीतपपुर्ती सोहळा



     पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव : ३०  मार्च, 

               गुरुवर्य शांतीब्रम्ह धर्माचार्य, रायगड भूषण ह.भ.प.मारुती महाराज ( दादा ) राणे हालिवली - कर्जत व गुरुवर्य रायगड भूषण ह.भ.प. मधुकर महाराज पाटील माजगांव यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थ महिला,तरुण मंडळ माजगांव यांच्या सदविचाराने अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायीक ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले आहे.गेली गेली ३६  वर्ष माजगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून या प्रारंभ सोमवार दि.०१/०४/२०२४ व सांगता ०८/०४/२०२४ होणार आहे.
                 पहाटे ४ ते ६ काकडा भजन भुपाळया.सायं. ६ ते ७वा. सामुदायिक हरिपाठ, सकाळी ८ ते १२ वा. ज्ञानेश्वरीचे पारायण रात्रौ ९ ते ११ वा. हरिकिर्तन व नंतर जागर भजन होणार आहे.तसेच रविवार दिपोत्सवाचा कार्यक्रम रात्री ७ : ०० वाजता होणार आहे.
                       या काल्याचे किर्तन ह.भ.प. गुरुवर्य रामदास महाराज पाटील (गुरुकुल महड) सेवासौजन्य राजेश शि पाटील (उपसरपंच ग्रा.पं.माजगाव) यांजकडून तसेच काल्याचा महाप्रसाद ह.भ.प. नामदेव वाळू पाटील, दिपाली नरेश पाटील, थेट सरपंच माजगांव व तृप्ती किशोर पाटील यांजकडून सप्ताहामधील किर्तनकारास सन्मानचिन्ह दिपाली नरेश पाटील,थेट सरपंच,माजगांव ग्राम पंचायत श्री.राजेश शिवराम पाटील उपसरपंच माजगांव ग्राम पंचायत याजकडून देण्यात येतील. अखंड हरिनाम सप्ताह माजगांव, श्री त्रीतपपुर्ती सोहळ्या निमित्त किर्तनकार व प्रवचनकार तसेच गावातील जेष्ठ श्रेष्ठ व्यक्ती यांस ३६ वर्ष अखंडपणे विविधरूपाने सेवादान केल्याबद्दल प्रामस्थ माजगाव यांच्या वतीने सम्मानपत्र प्रदान करण्यात येईल सौजन्य : आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय व भजनी मंडळ माजगाव यांच्या माध्यामातून करण्यात येइल           


Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण