इंडिया आघाडी तर्फे खोपोली येथे जाहीर निषेध..
आम आदमी पार्टी व इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांचा अन्यायाविरुद्ध एकत्रित बुलंद आवाज..
पाताळगंग न्युज : दत्तात्रय शेडगे खोपोली : २२ मार्च,
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इडी द्वारे अटक करण्यात आली आहे.जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेध नोंदविण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी खोपोली येथे शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर निषेध व्यक्त केला. यावेळी इंडिया आघाडीतील आप,नॅशनल काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना व शेकापचे पदाधिकारी हजर होतें.आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची अटक ही देशासाठी कलंकित घटना आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत असून संविधानिक मार्गाने निषेध लढा सुरूच राहील असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी केले आहे.
0 Comments