शिंग्रोबा देवाच्या उत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन,२ एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन

 शिंग्रोबा देवाच्या उत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन,२ एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन




पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : ३० मार्च,
 
          बोरघाटाचे जनक असलेल्या वीर हुतात्मा शींग्रोबा देवाच्या उत्सवाची पूर्वतयारी आणि नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ही बैठक मंगळवार २ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता दस्तुरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
            बोरघाटचे जनक म्हणून ओळखले जाणारे , आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव १ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.त्याची पूर्वतयारी आणि कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.असून या बैठकीला शींग्रोबा उत्सव  कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष  सदस्यसह   भाविक भक्त आणि समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वीर हुतात्मा शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर