के.एम.मोटर्स शोरूम उद्घाटन प्रसंगी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद, अवघ्या काही तासात ४ बाईक व ०१ इलेक्टरीक टेम्पो रिक्षा सेल
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ४ मार्च,
ऑटोमोबाईल क्षेत्रातील सेल सर्विस व फायनान्स विषयातील एक विश्वासाचे नाते के.एम.मोटर्स शोरूम दु चाकी यमहा, टीव्हीएस ,हिरो, केटीएम, रॉयलएनफिल्ड एक्टिवा , होंडा ,बजाज व तीन चाकी रिक्षा असे अनेक नामांकित ऑटोमोबाईल कंपन्याचे मल्टि ब्रँड वाहने या ठिकाणी खरेदी साठी उपलब्ध असणार.
शोरूमच्या या ग्रँड ओपनिंग च्या सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्या दहा दिवसाच्या खरेदी व बुकिंग वर ग्राहकांना आकर्षक भेट व सवलती उपलब्ध असणार.
ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण करीत पटेल बंधूंच्या वतीने खोपोली शहरात प्रथमच शिळफाटा , रायगड बाजार शेजारी , इंदिरा गांधी चौक पटेल प्रॉपर्टी ठिकाणी एका अनोख्या अंदाज मध्ये मल्टी ब्रँड टू व्हीलर, थ्री व्हीलर बाईक ,रिक्षा टेम्पो इलेक्ट्रिक वाहने अशा अत्याधुनिक विविध वाहनांचे सेल्स,सर्व्हिस उपलब्ध होणार असून ग्राहक समाधान संतुष्टी आणि विश्वास जपत एका व्यवसायिक नात्यास ह्या निमित्ताने प्रारंभ करण्यात येत असल्याचे के. एम. मोटर्स शोरूम व्यवस्थापन प्रमुख आदिल पटेल ह्यांनी सांगितले.
के.एम.मोटर्स शोरूम चा भव्य उद्घाटन सोहळा पटेल कुटुंबिय मित्र परिवार व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला .पाटील मित्र परिवार व कुटुंबातील घटक अनेक राजकीय, सामाजिक, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मान्यवर ह्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.अनेक बाईक रायडर सह अनेक गरजू ग्राहकांनी ह्यावेळी शोरूम ला भेट दिली प्रथम दिवसाचा ग्राहकांचा उत्साह प्रतिसाद ह्यावेळी पहायला मिळाला. प्रथम ग्राहक आकर्षक ऑफर विजेता म्हणून अहमद कर्जीकर मानकरी ठरले.
ह्या शुभ क्षणीं सुरू असलेल्या आकर्षक ऑफर मुळे ४ बाईक व ०१ इलेक्टरीक टेम्पो रिक्षा विक्री झाली असून अनेक ऍडव्हान्स बुकिंग स्वीकारण्यात आल्या.शुभेच्छा आशीर्वाद व सहकार्यासाठी के एम मोटर्स व्यवस्थापन प्रमुख उद्योजक आदिल पटेल व उत्तम फायनान्स तज्ञ रियाझ देसाई ह्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
ह्यावेळी पारिवारिक सदस्य ज्येष्ठ बंधू मुजफ्फर पटेल, माजी नगर सेवक कमाल पटेल, माजी नगर सेवक कयूम पटेल ,नासिर पटेल ,आसिफ पटेल व अन्य पटेल व देसाई परिवारा तर्फे के. एम. मोटर्स शोरूम च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा देण्यात आले.
0 Comments