प्लास्टिक बंदीसाठी विद्यार्थ्यांचे सरसावले पुढे हात, कागदावर चित्र काढून जनजागृती
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : ५ मार्च,
सध्या प्लास्टिक चा वापर मोठ्या प्रमाणात वाढले असून,या पासून पर्यावरणांस धोका निर्माण होत चालला आहे. मात्र यांचे गांभीर्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यांचा पाहावयास मिळत आहे.यांचाच फटका मुक्या प्राण्यांना बसत आहे.नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा परिषद शाळा माजगांव येथील विद्यार्थांनी प्लास्टिक बंदीसाठी हात पुढे सरसावत असून या माध्यमातून कागदावर याचे धोके,प्रदूषण हे चित्र काढून जनजागृती करण्यात आली.
आपल्या घरामध्ये भाजी,दुध,चॉकलेट,बीस्कीट, असे विविध प्रकारचे प्लास्टिक घरात असून आपण ते कचरा कुंडीत टाकत असतो. मात्र तसे न करता आपण एका पाण्यांची बीस्लेरी बॉटल मध्ये घडी करुन आत मध्ये टाकल्यांस ह्या पिशव्या बाजुला करण्यांस स्वच्छता कर्मचारी यांस श्रम होणार नाही.तसेच यांचे विल्हेवाट लावण्यांस सोयीस्कर होइल ह्यांचे प्रात्येक्षिके विद्यार्थ्यांनी करुन दाखविले आहे.यामुळे आपल्याला या पिशव्या काही दिवसांमध्ये आजुबाजुला पडलेल्या दिसणार नाही.मात्र त्या साठी प्रत्येकांनी यांची कृती करायला हवी.
प्लास्टिक हा पर्यावरणांस घातक असून यासाठी ठोस पाऊले उचलणे अतिषय महत्वाचे आहे.मात्र कोणीही त्यांचे आचरण करीत नसल्यामुळे आज दिवसेंदिवस यांचा वापर वाढत चालला आहे.मात्र शाळकरी मुलांनी हा उपक्रम राबवून ग्रामस्थांच्या मध्ये एक उत्तम संदेश दिला आहे.यासाठी राजिप शाळा माजगांव मुख्याध्यापक- किरण कवाद,शिक्षक - भुषण पिंगळे,रेखा जाधव,शाळा व्यवस्थापन समिती यांनी सहकार्य केले .
0 Comments