९ मार्च ला हळदि कुंकु ह्या कार्यक्रमाचे आयोजन,माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांची पत्रकार परिषद

 


९ मार्च ला हळदि कुंकु ह्या कार्यक्रमाचे आयोजन,माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा  सभापती सुधाकर घारे यांची पत्रकार परिषद 



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : ३ मार्च,


              खालापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित पवार गट)यांच्या वतीने  जागीतक महिला दिनाचे औचित्य  खालापूर तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि खेळ रंगला पैठणीचा महिलांचा सन्मान सोहळा  आयोजित करण्यात आला आहे, हा कार्यक्रम सोहळा शनिवार ९ मार्च रोजी एसपी ग्राउंड ताकई येथे सायंकाळी ४ वाजता  होणार आहे, त्या अनुषघांने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा  सभापती सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती देण्यात आली.
                  या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून, राष्ट्रवादी कॉग्रेस  प्रदेशाध्यक्ष  खासदार सुनील तटकरे, ,वरदा सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, अभिनेत्री अक्षया देवधर, अभिज्ञा भावे, राधा पाटील, आर जे , अक्षय आदी उपस्थित राहणार आहेत, तर या कार्यक्रमाला  खालापूर तालुक्यातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा  सभापती सुधाकर घारे यांनी केले.
             यावेळी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी  खालापूर तालुका अध्यक्ष  संतोष बैलमारे, युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे, महिला अध्यक्षा आदींसह अनेक राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर