वारकरी सांप्रदायकडून संस्कृतीचे जतन होत-आ. महेंद्र थोरवे

 वारकरी सांप्रदायकडून संस्कृतीचे जतन होत-आ. महेंद्र थोरवे 



पाताळगंगा न्युज : दिनेश पाटील 
साजगाव : १२ एप्रिल,

             वारकरी सांप्रदाय मुळे धर्माचा प्रचार होत संस्कृतीचे जतन होत.यासाठी धर्मसांप्रदाय वाढला पाहिजे ही काळाची गरज आहे असे वक्तव्य आ.महेंद्र थोरवे यांनी चिंचवळी गोहे येथील दीपोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले.
                      ह.भ.प.जेष्ठ कीर्तनकार रामदास महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातिल चिंचवळी गोहे येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले कर्जत खालापूरचे आ.महेंद्र थोरवे यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करीत दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली.                                                यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार मांडताना,वारकरी सांप्रदायमुळे धर्माचा प्रचार होत असून संस्कृतीचे जतन होत आहे.यामुळे धर्मसांप्रदाय वाढला पाहिजे ही काळाची गरज आहे.आपल्याकडे दातृत्व असेल तरच समाज मोठा होईल.महाराष्ट्रात आपण जे संस्कृतीचे जतन पाहत आहोत ते एकमेव मात्र येथे होणाऱ्या धर्मसांप्रदाय कार्यक्रमामुळे होत आहे. सध्या मोबाईलच युग आहे.लहानपणीच मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो. आणि त्यातूनच पुढच्या पिढीच्या विचारांमध्ये बदल घडून संस्कृतीचा ऱ्हास होण्यास सुरुवात होत आहे. 
           

            मुलांना मोबाईल पासून दूर करीत आज चिंचवली गोहे येथे सुरु असलेल्या दीपोत्सवासारख्या कार्यक्रमात त्याना घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या विचारासाराणीत धर्मासोबत संस्कृतीचे संस्कार लहानपणातच मुलांवर होतील. आणि त्याचा फायदा पुढील पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठी होईल.आज येथे गावातील एकीचे दर्शन होत आहे.नक्कीच हे संस्कार अशाच धार्मिक कार्यक्रमातून यांच्यावर घडले असतील.अश्या कार्यकमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत असताना अनेकजण निस्वार्थीपने आपले कार्य करीत आहेत.
               महाराष्ट्रात अजूनही संस्कृतीचे जतन चांगल्या प्रकारे केले जात आहे.यापूर्वी अनेक महान संत आपल्याइथे जन्माला आले.आणि त्यानी आपल्याला त्यागातून मोक्षाकडे कसे जायचे हे शिकवीले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले मात्र ते निर्माण करण्यासाठी संतानीच सामर्थ्य दिले.आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज हिंदू क्रांती झाली आहे.असे वक्तव्य केले.
            या दीपोत्सवावेळी माजी आ.सुरेश लाड,मा.जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील,मा.  उपसरपंच संदीप पाटील,युवासेना तालुका रोहित विचारे,साजगावचे सरपंच विनोद खवले,उपसरपंच हेमंत देशमुख,आत्करगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील,हभप तानाजी महाराज कर्नूक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर