सेंट मेरी स्कुल खरसुंडी फी वाढिव संदर्भात,पालक वर्ग अक्रमक,युवा सेना कॉलेज कक्ष अधिकारी प्रतिक शिंदे यांची घेतली भेट

 सेंट मेरी स्कुल खरसुंडी फी वाढिव संदर्भात,पालक वर्ग अक्रमक,युवा सेना कॉलेज कक्ष अधिकारी प्रतिक शिंदे यांची घेतली भेट 


पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खरसुंडी :  ९ एप्रिल,

            खरसुंडी येथे असलेली सेंट मेरी स्कुल इंग्लीश मेडीयम स्कुल ) मागील एक आठवड्यापासून आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्यांचा निर्णय घेतला  आहे,कारण अचानक भरमसाठ फी वाढल्यामुळे पालकांचे अर्थिक बजेट कोलमडले असल्यामुळे जो पर्यंत फी कमी होत नाही तो पर्यंत शाळेत न पाठविण्यांचा निर्णय पालकांनी घेतला.मात्र शाळा व्यवस्थापक यांचा मनमानी कारभारामुळे युवा सेना कॉलेज कक्ष खालापूर तालुका अधिकारी प्रतिक शिंदे यांचा नेतृत्वाखाली खरसुंडी गावदेवी मंदिर येथे पालकांची सभा घेण्यांत आली.
               यावेळी ते बोलतांना म्हणाले की आपण लवकरच या माध्यमातून मार्ग काढणार असून,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू देणार नाही.तसेच गट शिक्षणांधिकारी खालापुर - चोरमले,यांस शाळेच्या मनमानी कारभार  ,भरमसाठ फी वाढ,अरेरवी भाषा तसेच सीबीएसी बोर्ड मान्यता या संदर्भात पुर्ण महिती घेणार आहे.यावेळी पालक वर्ग अक्रमक झाले आहे. शाळेच्या मान्यता संदर्भात पुर्णपणे माहिती उपलब्ध झाली नाही तर आमच्या मुलांचा दाखला द्यावा असा एल्गार या सभेत या सभेत घेण्यांत आला.
                 या वेळी शेकडोच्या च्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.शाळा व्यवस्थापक यांनी फी वाढावी मात्र येथिल पालकांचे अर्थिक बजेट च्या नुसार मात्र दर वर्षी ३५ ते ४० टक्के फी वाढत असेल तर मुलांना शिक्षण देण्यांस अनेक समस्या निर्माण होवू शकतात.मात्र शाळा व्यवस्थापक यांना कोणतेही सोयर सुतक नाही. यावेळी सर्व पालक वर्ग अक्रमक झाल्यांचे पहावयांस मिळाले यावेळी युवा सेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड उपप्रमुख धर्मेश परमार ,युवा सेना कॉलेज कक्ष खोपोली शहर अधिकारी जय निवृत्ती खेडकर ,रायगड जिल्हा सक्रीय सदस्य हरेश कराळे,राकेश झोमटे,कर्जत तालुका अधिकारी सूरज म्हसे,कर्जत सहसंपर्कप्रमुख विनोद पांडे किशन चौहान, चेतन मिसाळ,मयुरेश नागोटकर,शरद घोडविंदे, संकेत हडप,आहाद सय्यद, साहित्य चौधरी,अविनाश शिर्के,अभिराज महाले, ध्रुव परमार, मयूर जाधव, वैभव भोईर अदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर