राजू गायकवाडच्या नेतृत्वाखाली प्रभाग १४ मध्ये आढाव बैठक संपन्न, कार्यकर्त्यांचा भरघोष प्रतिसाद
पाताळगंगा न्युज : दिनेश पाटील
साजगाव : ७ एप्रिल,
लोकसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना भरघोष मताने निवडून आणण्यासाठी आ.महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खापोळीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला.यावेळी खा श्रीरंग बारणे यांना भरघोष मताने निवडून आणणार असा पवित्रा जमलेल्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
मावळ मतदार संघांचे सध्या वातावरण तापले आहे.लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येक पक्ष आपापल्या परीने बांधणी करीत असताना महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेसहित मित्रपक्षातील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात केल्याने या निवडणुकीत आता वेगळीच रंगत पहावयांस मिळत आहे.त्यामुळे कर्जत विधानसभा मतदार संघातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील कार्यकर्ते पक्षाच्या मजबुतीसाठी प्रयत्नात असताना आ महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीत प्रभाग क्रं १४ मध्ये माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी आघाडी घेतली असून तेथील कार्यकर्त्यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली.यावेळी मोठ्या संखेने कार्यकर्त्यांनी सहभाग दाखविला होता.राजू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आपण खा.श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतदान करून त्यांच्या विजयाच्या कार्यात आपला वाटा कसा तयार करता येईल.
यावेळी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना,खा बारणे यांनी खोपोलीकरांसाठी केलेले कार्य,खोपोलीच्या विकासासाठी दिलेला निधी आणि त्याचा वापर करून खोपोलीचा विकास कसा केला याबाबत सविस्तर माहिती देत आ महेंद्र थोरवे आपल्या परीने कर्जत खालापूर मतदार संघातून सर्वात जास्त आघाडी देणार असल्याने त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपणही खा बारणे यांनाच मतदान करू आणि खोपोलीच्या विकासाचा साक्षीदार बनू असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी यावेळी केले.
या आढावा बैठकीला पंकज पाटील,शहरप्रमुख संदीप पाटील,शिवउद्योगचे जिल्हाप्रमुख हरेश काळे,अनिल मिंडे,प्रिया जाधव यांसह मोठ्या संखेने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपास्थित होते.
0 Comments