लायन्स क्लब खालापुर यांच्या वतीने व अखंड हरिनाम सप्ताह माजगाव त्रीतपपुर्ती सोहळ्यांच्या निमित्ताने ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

 लायन्स क्लब खालापुर यांच्या वतीने व अखंड हरिनाम सप्ताह माजगाव त्रीतपपुर्ती सोहळ्यांच्या निमित्ताने ग्रामस्थांची आरोग्य तपासणी 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली  : ८ एप्रिल,

           माजगांव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह त्रीतपपुर्ती सोहळा
गेली गेली ३६  वर्ष माजगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून लायन्स क्लब खालापुर यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी हॉस्पीटल कळंबोली यांच्या मार्फत मोफत औषद वाटप व तपासणी विठ्ठल रुक्मिनी मंदिर माजगांव, येथे करण्यांत आली यावेळी या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या वारकरी यांनी आरोग्य तपासणी करण्यांत आली. 
                आज वाढत जाणारी महाघाई यामुळे आपण आपल्या आजारांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असतो.मात्र काही वेळा हेच छोटे आजार आपल्या जिवावर बेतू शकतात.प्रत्येकांची घरची स्थिती उत्तमच आहे असे नाही.लायन्स क्लब यांच्या संकल्पनेतून या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्दी ,ताप ,खोकळा,डेंग्यू,बीपी ,शुगर,टाचांचे आजार,गुढगे दुःखी,कंबर दुःखी,ऑक्सिजन लेव्हल,त्वचा रोग,वजन उंची अदि तपासणी करण्यात आली.तसेच औषध ही देण्यात आली.
             या कार्यक्रमाचे आयोजन आयोजन माजगांव ग्रामस्थांच्या माध्यमातून आणी लायन्स क्लब च्या माध्यमातून करण्यांत आले.यावेळी जिल्हा समन्वयक -ज्योली देशमाने अध्यक्ष - शिवानी जंगम,सेक्रेटरी - रामचंद्र गायकवाड,खजिनदार- किशोर पाटील,प्रांतपाल - अमरचंद शर्मा,एस.आर. परमेश्वरन,संजिव सुर्यवंशी,सहखजिनदार - मिनिल खालापूरकर,उपाध्यक्ष - भरत पाटील,उपाध्यक्ष - लहु भोईर तसेच या त्रीतपपुर्ती सोहळ्यांचे कमिटी,अध्यक्ष,तसेच वारकरी,ग्रामस्थ,महिला वर्ग उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण