सामाजिक एकात्मतेसाठी सर्व समाजानी एकत्र येण गरजेच आहे -आ महेंद्र थोरवे

 सामाजिक एकात्मतेसाठी सर्व समाजानी एकत्र येण  गरजेच आहे -आ महेंद्र थोरवे



पाताळगंगा न्युज : दिनेश पाटील                                         साजगाव : ७ एप्रिल 

                आपण सर्व एकच आहोत ही भावना निर्माण होण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी इफ्तार पार्टीला येण महत्वाचे आहे.यातून जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण होतो असे वक्तव्य कर्जत खालापूरचे आ. महेंद्र थोरवे यांनी खोपोलीत झालेल्या इफ्तार पार्टीमध्ये केले.
           मुस्लिम धर्मात रमजान महिना पवित्र मानला जातो.या महिन्यात सर्वजण एकत्र येत धार्मिक वातावरणात न्याय,समता,धार्मिक सहिष्णूता वाढीस लागण्यास मदत मिळते त्यामुळे इफ्तार पार्टीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.याच निमित्ताने खोपोलीतही इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात आले होते.शिवसेना उपशहरप्रमुख मोहसीन शेख यांच्या नेतृत्वाखाली खोपोली बाजारपेठेतील मज्जीद येथे आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीत कर्जत खालापूरचे आ महेंद्र थोरवे यांनी हजेरी लावली होती.
         

   यावेळी मोठ्या संख्येने जमा झालेल्या सर्व धर्मातील बांधवाना संबोधन करताना पवित्र असलेल्या रमजान महिन्यातील धार्मिक वातावरणामुळे न्याय,समता तसेच धार्मिक सहिष्णूता वाढीस लागते.आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धीगंत होण्यासाठी आशा इफ्तार पार्टीच महत्व आहे.सामाजिक आणि जातीय सलोखा तसेच एकत्मतेसाठी सर्व समाजातील लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे असे विचार मांडले 
          खोपोली शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीत विश्वजित बारणे, विजय पाटील,शहरप्रमुख संदीप पाटील,अबू जळगावकर, पंकज पाटील,सिद्धांत शेलार,तालुकाप्रमुख संदेश पाटील,नगरसेवक अमोल जाधव,वालचंद ओसवाळ,संतोष मालकर, मुकेश रुपवते यांसह मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर