संत श्री बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन २ दिवस उत्सव होणार साजरा

 संत श्री बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन २ दिवस  उत्सव होणार साजरा



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १३ एप्रिल,

             अखंड भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री बाळू मामा देवाच्या उत्सवाचे आयोजन  करण्यात आले असून हा उत्सव २२  व २३ एप्रिल या दोन दिवस (पांगोळी धनगरवस्ती लोणावळा )बाळू मामा मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. 
                पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती  ठिकाणी  पागोळी लोणावळा येथे  संत श्री बाळू मामाच्या देवाचे भव्य मंदिर असून दररोज लाखो भाविक भक्त येथे येत असतात दरवर्षी मोठया उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येतो त्यांच प्रमाणे या वर्षी दोन दिवस या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे 
              सोमवार २२  एप्रिल रोजी   सायंकाळी ४ वाजता भजन, ६  वाजता ह.भ.प.गुरुवर्य संजीवनीताई शिंगाडे यांचे  कीर्तन,७ वाजता महाआरती, ९  वाजता होम मिनिस्टर (सुशांत घाटसावलीकर सिने अभिनेता )
            मंगळवार २३  एप्रिल रोजी सकाळी ६  वाजता अभिषेक, ७ : ३०  वाजता महाआरती,९  वाजता सत्यनारायण महापूजा, १०  वाजता भजन, (श्री साई शंकर महाराज भजनी मंडळ लोणावळा )१२  वाजता होमहवन,सायंकाळी ४  वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक ७: ३०  वाजता ला महाआरती, ८ वाजता श्रींची भाकणूक, ९:३०  वाजता महाप्रसाद होणार आहे 
          तरी या संत श्री बाळू मामा देवाच्या  उत्सावाला सर्व भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत श्री बाळू मामा देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त तथा माजी आदर्श सरपंच बबन खरात  यांनी केले आहे,

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण