महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील गावोगावी ग्रामस्थ,कार्यकर्ते यांस भेट,प्रचार दौरास यात्रेसारखे स्वरुप

 महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील गावोगावी ग्रामस्थ,कार्यकर्ते यांस भेट,प्रचार दौरास यात्रेसारखे स्वरुप 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली   : १२ एप्रिल,

             मावळ लोकसभा मतदारसंघातील इंडीया महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे- पाटील यांनी मागील आठवड्यापासून पाताळगंगा या परिसरातील असलेल्या गावांना भेटी देण्यांस सुरुवात केली आहे.मात्र हे भेटीची निमित्त असले,तरी सुद्धा या माध्यमातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्या अगोदर ग्रामस्थ आणी कार्यकर्ते संवाद दौरा सुरु केला आहे. यावेळी गावोगावी,ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत असल्यांचा दिसून येत होते.कारण आता जनतेला सुद्धा राजकारणांची भाषा कळत आहे.यामुळे गद्दारांना गाडा,आणी संजोग वाघेरे- पाटील यांना निवडून आना असा एल्गार ऐकण्यांस मिळत होते.
           

  सकाळी नऊ वाजता वडगांव जिल्हा परिषद विभागातील असलेल्या गावांना भेट देवून येथिल ग्रामस्थांचे मनोबळ वाढविण्यांसाठी तुपगाव,पाली सारंग,असरोटी,टेभरी,वयाल,वडगाव, वाशिवली,बोरिवली, कैरे,वाणीवली,तळवली,लोहोप,कोपरी,इसांबे,आंबिवली,माजगाव,वारद,पौद,आसरे,आसरेवाडी,धारणी,नडोदे,निगडोली,माड, खरसुंडी,कुंभीवली,वडवलं ग्रा. तांबाटी,खिरकिंडी,डोनवत,गोरठन,वनवठे,सावरोली,  धामणी सुरु झालेला हा प्रचार दौरास ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यांचे पहाव्यांस मिळाले.यावेळी वाघेरे साहेब आगे बढे हम तुम्हारे साथ है ही ललकारी घुमत असल्यांची ऐकण्यांस मिळत होती.
           मागील आठवड्यापासून सुरु असलेला हा प्रचार  दौरा प्रत्येक गावातील तरुण वर्ग,शिवसेनेचे पदाधिकारी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.त्याच बरोबर गावोगावी नागरिकांच्या समस्या विचारात घेत या समस्या मार्गी लावण्यांचे काम करणार असल्यांचे सांगितले,रणरणत्या उन्हाची पर्वा न करता,शेकडो कार्यकर्ते आपल्या जवळ असलेल्या वहान घेवून गाव भेटी आणी प्रचार दौरा सुरु असल्यांचे पहावयांस मिळत होते.कारण जनतेला सुद्धा समजले आहे.की गद्दर कोण आहे. हिच वेळ आहे. ती धडा शिकविण्यांची असा एल्गार या प्रचार दौरामध्ये ऐकण्यांस मिळाला.

            यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उत्तम भोईर, सुनील थोरवे, मंगेश पाटील - युवासेना उपतालुका अधिकारी,राजेश मेहत्तर, अंकुर बामणे, तेजस पाटील, सुबोध पाटील दीपक जाधव, वसंत जाधव, शांताराम ठोंबरे, शाखा प्रमुख चंद्रकांत जाधव, प्रदीप जाधव, रमेश जाधव,सदस्य, राजेश पाटील, हर्षल ठोंबरे,भूषण जाधव, दीप जाधव श्रवण लभडे,गजानन जाधव, अशोक जाधव, संदीप जाधव महिला वर्ग ग्रामस्थ,आजी माजी पदाधिकारी  उपस्थित होते.
             
               
                


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर