श्री आई साबाई माता मुळस्थान ढापणी गडावर झेंडा लावण्याची परंपरा कायम

श्री हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने खालापूर ची ग्रामदेवता श्री आई साबाई माता मुळस्थान ढापणी गडावर झेंडा लावण्याची परंपरा कायम 







पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर  : २३ एप्रिल,

                छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटला आणि त्यानंतर परतीच्या प्रवासात खालापूर येथील आई साबाई मातेच्या प्रांगणात तो मुक्कामी ठेवला अशी माहिती आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे श्री साबाई मातेच मूळ मंदिर गावालगतच्या उंच ढापणी डोंगरावरील पठरावर होतं. नित्य नियमाने पूजा अर्चा व्हायची परंतु त्या पूजेचा मान गुरव कुटूंबातील एका महिलेकडे होता.
               ती महिला गर्भवती राहिल्याने तिला डोंगरावर जाने सहज शक्य होतं नव्हते.तेव्हा तिने देवीला प्रार्थना केली मला ही सेवा करायला मला कस शक्य होईल तू काहीतरी मार्ग काढ. तेव्हा त्या महिलेच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला की मि तुला सोईसकर अश्या ठिकाणी येईन.
दुसऱ्या दिवशी नित्यनियमाने पूजा अर्चा झाल्यानंतर देवी तिच्या मागोमाग खालापूर गावात येण्यास निघाली. दृष्टांतात सांगितल्या प्रमाणे मागे वळून पाहायचे नव्हते परंतु ती महिला औचित्य म्हणून मागे वळून पाहिले व देवी तिथेच अंतर्धान पावली. कालांतराने तेथे मंदिर बांधण्यांत आले. आज तिथे मोठे भव्य मंदिर पाहायला मिळत आहे.परंतु आजही भाविक भक्त साबाई मातेच्या मुळस्थानी दर्शनासाठी जात असतात.
                     हनुमान जयंतीच्या निमित्ताने खालापूर ग्रामस्थ मानाचा झेंडा ढापणी गडावर घेऊन जातात. श्री साबाई मातेची पूजा अर्चा करून तो झेंडा लावण्याची परंपरा आहे.आणि तो झेंडा अर्थातच निशाण पूर्ण वर्षभर उन्ह, वारा, पाऊस झेलत फडकत राहतो. कारण त्यामागे सर्वांची श्रद्धा दडलेली असते, भक्ती प्रकट झालेली असते. शेकडो वर्षे सरली पिढ्या बदलल्या आचार विचार बदलले पण भक्तांची श्री साबाई मातेवरची व हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर भगवी पताका लावण्याची श्रद्धा अबाधित आहे.आज ही परंपरा मंदीराचे पुजारी राजू देसाई व दिपक जगताप व ग्रामस्थ यांच्या मदतीने जोपासत आहेत.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण