माजगांव येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : २३ एप्रिल,
आज हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे ग्रामीण भागात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्यांचे पहावयांस मिळावे.विशेष करुन कोणतेही धार्मिक कार्यक्रम हे तरुण वर्ग करीत असल्यामुळे तरुण वर्गामध्ये नव चैतन्य निर्माण झाल्यांचे पहावयांस मिळाले.बोलो वीर हनुमान की जय' 'पवनपुत्र हनुमान की जय'या घोषात,हनुमान चालीस म्हणत हा परिसर भक्ती रसात तल्लीन झाल्यांचे पहावयांस मिळाले.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहाटे पासुनच तालूक्याच्या सर्वच ठीकाणी भजन, कीर्तन, प्रवचन,विधिवत पूजाअर्चा, आभिषेक करून जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला.तसेच सत्यनारायणाची महापुजा,महाप्रसाद,रात्री जागर भजन ग्रामस्थ मंडळ माजगांव यांचे झाले.हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये भाविक भक्तांची रेलचेल सुरु असल्यांचे पहावयांस मिळाले.त्याचबरोबर धार्मिक आणि आध्यात्मक कार्यक्रमाचे करण्यांत आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जयेश पाटील,संदीप काठावले, सचिन काठावले ,किशोर काठावले, शरद काठावले, राजेश पाटील,हरेश पाटील,ऋषींकेश पाटील, किरण पाटील, सतीश पाटील, मोतीराम काठावले,कैलास काठावले , गणेश काठावले,राम काठावले,रणधिर पाटील, दीपक काठावले,दिलीप काठावले ,अदिच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून करण्यांत आले.
0 Comments