महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे एकदिलाने काम करू राष्ट्रवादी नेते सुधाकर घारे

 महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे  एकदिलाने काम करू      राष्ट्रवादी नेते सुधाकर घारे 




पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २५ एप्रिल,


          मावळ लोकसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष एकदिलाने काम करून बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करू  असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष खोपोली शहर यांच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक खोपोलीतील लायन्स क्लब हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता.
             यावेळी ते बोलत होते महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट )सामील झाल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीचे काम करण्याचे  आम्हाला आणि कार्यकर्त्यांना आदेश दिले  असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचे काम   करून  बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आवाहन केले आहे.
                    या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, शिवसेना( शिंदे )उत्तर रायगड संपर्क प्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादी खोपोली शहर अध्यक्ष  मनेष यादव, महिला अध्यक्षा वैशाली जाधव, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव,मंगेश दळवी, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, महादू जाधव, सुरेखा खेडेकर, आदिसह अनेक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर