एस.एच.केलकर वानिवली येथील कारखान्यास भीषण आग,धुरामुळे ढगाळ वातावरण

 एस.एच.केलकर वानिवली येथील कारखान्यास भीषण आग,धुरामुळे ढगाळ वातावरण 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
वडगांव  : २३ एप्रिल,

                ग्रुप ग्राम पंचायत वडगांव हद्दीतील वानिवली येथील असलेली एस.एच.केलकर या कंपनीस भीषण आग लागली, मात्र काही वेळातच या आगीने रुद्र रूप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण आणणे अवघड झाले,मात्र ही आग कश्यामुळे लागली हे मात्र समजले नसले तरी सुद्धा या आगीने दहा ते बारा किलोमीटर चा परिसर धुरांनी वेधले गेल्याचे निदर्शनास आले.या कंपनीत विविध प्रकारचे सेंड ( अत्तर ) निर्माण करीत आहे.मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.साधारण ही सायंकाळी ५ : १५ वाजता आग लागल्याचे समजते.
            ह्या आगीवर नियंत्रण मिळविण्यांसाठी फायर ब्रिगेट च्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु होते.या ठिकाणी पाहावयास मिळाले,शिवाय ह्या आगीमुळे येथील परिसर ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहावयास मिळाले,ज्या प्लांट मध्ये आग लागली त्या ठिकाणी किती कामगार काम करीत होते,हे मात्र समजू शकले नाही.मात्र ही आग लागताच क्षणी  यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहावयांस मिळाले.
                   ही आग सुरुवातीला अल्प असल्याचे बोलले जात होते, मात्र काही वेळातच या आगीने रुद्र रूप धारण केल्यामुळे व्यवस्थापक यांची तारांबळ उडाली,या परिसरात शेकडो कारखाने असून सातत्याने कोठे - कोठेतरी आग लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र या पासून कामगार वर्गांचा नाहक बळी गेल्याचे पाहावयास मिळत आहे.मात्र असे असले तरी सुद्धा आगीच्या बाबतीत प्रशासन गांभीर्य घेत नसल्याचे पाहावयांस मिळत आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर