महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू - रासप कोकण प्रदेशाध्यक्ष - भगवान ढेबे

 महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू - रासप कोकण प्रदेशाध्यक्ष - भगवान ढेबे 



पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २५ एप्रिल,


             मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठीमागे राष्ट्रीय समाज पक्ष ठामपणे उभा असून त्यांना मावळ लोकसभा मतदार संघात मोठ्या मतांनी आघाडी देऊन विजयी करू असे आश्वसन राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे यांनी दिले आहे.
           राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर हे महायुतीत सामील झाले असून त्यांना महायुतीतील परभणी लोकसभेची जागा देण्यात आली असून तेथे शिवसेना( शिंदे गट,)राष्ट्रवादी (अजित पवार गट ) भाजपा, आरपीआय, आणि मित्र पक्ष यांनी मोठी ताकद  उमेदवार महादेव जानकर यांच्या पाठीशी उभी केली असून  त्यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. 
                  मावळ लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी ताकद असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठीमागे राष्ट्रीय समाज पक्ष हा उभा असून त्यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्ता कामाला लागला आहे, 
 मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून  नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विजयी करा असे आवाहन मावळ मतदार संघातील  कार्यकर्त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर