राजिप शाळा वडगांव येथे, होय मी मतदान करणार,यांची उभारली गुढी
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगांव : ८ एप्रिल,
रायगड जिल्हा परिषद शाळा,वडगाव येथिल विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक सुभाष राठोड व शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली गावातून स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती व गुढीपाडवा या सणांचे औचित्य साधून होय मी मतदान करणार अशी गुढी उभारण्यांत आली.यावेळी विविध घोषणापत्रे व गुढी हातात घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.सोबतच स्वाक्षरी मोहीम राबवून मतदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.यावेळी घोषवाक्ये व हातातील फलक मतदारांचे लक्ष वेधून घेत असल्यांचे पहावयांस मिळाले.
यावेळी मतदारांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदवत असल्यांचे पहावयांस मिळाले.या रॅलीत सहभाग घेत होय मी मतदान करणार असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.विद्यार्थ्यांच्या हातात असलेली गुढीचे दर्शन घेत चिमुकल्यांचे कौतुक होत असल्यांचे पहावयांस मिळाले.यावेळी गावातील सर्व नागरिक,पालक,ग्रामस्थ व युवकवर्ग मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
निवडणूक निर्णय अधिकारी अजित नौराळे, तहसीलदार आयुब तांबोळी,निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या मार्गदर्शनाने व गटशिक्षणाधिकारी खालापूर कैलास चोरामले यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते.मतदारांना याबाबत जागृत व्हावे व मतदानाची जागरूकता वाढावी यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही गुढी उभारून रॅली काढण्यात आली.शिक्षक वैजनाथ जाधव,विषय शिक्षिका सरस्वती कवाद स्वयं सेविका निकिता व साक्षी अदि उपस्थित होते.
0 Comments