पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर होतो हे सांगायला मला लाज वाटत नाही परंतु, तुम्हाला तर मतदार ओळखत नाहीत - महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा श्रीरंग बारणेवर पलटवार

 पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर होतो हे सांगायला मला लाज वाटत नाही परंतु, तुम्हाला तर मतदार ओळखत नाहीत - महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा श्रीरंग बारणेवर पलटवार

   

 पाताळगंगा न्युज :  समाधान दिसले
खालापूर : ६ एप्रिल,

             मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ येतात. मतदारसंघात काही वर्षापासून काम करीत आहे,यादरम्यान लोकांपर्यंत पोहचत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर असताना केलेल्या विकासकामांची माहिती मी सांगत आहे. त्यामुळे मी महापौर होतो हे सांगायला मला लाज वाटत नाही नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे मावळ संघटक संजोग वाघेरे यांनी सांगत १० वर्ष खासदार असूनही तुम्हाला तर मतदार ओळखत नाहीत असा पलटवार वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर केला आहे.संजोग वाघेर यांनी खालापूरात मतदारांच्या भेटीगाठी घेत होते.

             शिवसेना ठाकरे गट मावळ मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे फिरत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर होतो अशी ओळख सांगावी लागत असल्याची टिका खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्यासंबधी संजोग वाघेरे पाटील यांना प्रश्न विचारला असता गेले ३० ते ३५ वर्ष मी राजकारणात, महापौर होतो हे सांगताना मला लाज कसली असे वाघेरे पाटील यांनी सांगत मावळ मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातील महानगर, नगरपालिका, जि.प, पं.स.वाड्या - वस्त्यांवर फिरत असताना येथील प्रश्न समस्या वेगवेगळ्या आहेत. 

              त्या समस्या नागरिकांनी खासदारांकडे मांडल्या, त्या सोडविल्या नसल्याचे मतदारांचे म्हणने आहे. विकासकामांच्या जाहिर नाम्यातील कामे झाली नसल्याचा आरोप वाघेरेनी करीत खासदार फक्त ओव्हर काँन्फीडन्समध्ये आहेत, असेही म्हणाले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर