सेनेच्या ओबीसी सेल खोपोली शहर प्रमुखपदि ईश्वर शिंपी

 सेनेच्या ओबीसी सेल खोपोली शहर प्रमुखपदि ईश्वर शिंपी 




पाताळगंगा न्युज : दिनेश पाटील 
साजगांव : ७ एप्रिल ,
      
             शिवसेनेचे कार्य जणसामान्यांनपर्यंत पोहचविण्यात कुशल असलेले तसेच राजकारणातून समाजकारण करणारे खोपोलीतील व्यावसायिक ईश्वर शिंपी यांची शिवसेनेच्या ओबीसी सेल खोपोली शहर प्रमुखपदी आ महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.  
                    दीड वर्षांपूर्वी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्या नंतर खोपोळीतील सेनेच्या जडणघडनिमध्ये अग्रेसर भूमिकेत असणारे म्हणून ओळखले जाणारे खोपोलीतील व्यावसायिक ईश्वर शिंपी यांनी विध्यार्थ्यांसह गोर- गरीब जनतेच्या हितासाठी नेहमीच संघर्ष केला.पक्षात आपण असल्याने त्याचा फायदा गोरगरीब जनतेला कसा होईल याचा जास्तीत जास्त विचार करून शिवसेने मार्फत राजकारणातून जास्तीत जास्त समाजकारण कस करता येईल याच साक्षात उदाहरण म्हणजे ईश्वर शिंपी
               यांच्या कार्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आ महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीत पार पडलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आ महेंद्र थोरवे आणि खा श्रीरंग बारने यांचे सुपुत्र विश्वजित बारणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आळी.यावेळी शिंपी यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठिनी घेतली असून ईश्वर शिंपी यांनी आजवर केलेल्या निस्वार्थी कार्याची पोचपावती त्यांना मिळाली असे आ महेंद्र थोरवे यांनी यावेळी वक्तव्य केले.
              तर आजपर्यंत जनतेच्या सेवेसाठी कार्य करीत आलो आहे.असे असताना पक्षाच अधिकृत पद मिळाल्याने अधिक ताकत मिळाली असून या संधीच सोन करीत जणतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करेन असे आश्वासन ईश्वर शिंपी यांनी दिल आहे.
                 यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय पाटील,पंकज पाटील,तालुका प्रमुख संदेश पाटील,माजी तालुकाप्रमुख संतोष विचारे,माजी नगराध्यक्ष मोहन औसरमल,युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे,संजय देशमुख,शहरप्रमुख संदीप पाटील,माजी नगरसेवक अमोल जाधव,तात्या रिठे,संतोष माळकर,चंद्रकांत फावडे,प्रशांत गोरे यांसह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर