तालुक्याच्या ठिकाणी मंगरूळ मासे सुरु, ? मात्र माजगाव येथील शेतकरी बांधवांवर अन्याय का ?मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांचा सवाल
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
माजगाव /आंबिवली ५ एप्रिल,
खालापूर तालुक्यातील मंगरूळ मासे यांचे उत्पन्न घेण्यांसाठी शासनांने बंदी घालण्यात आली असली तरी सुद्धा काही ठिकाणी हा व्यवसाय सुरु असल्याची चर्चा तालुक्यात ऐकण्यांस मिळत आहे.मात्र काही ठिकाणी खुले आमपणे हा व्यवसाय सुरु आहे.ह्या व्यवसायापासून शेतकरी बांधवास रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्या रोजगारांचा प्रश्न मार्गी लागत होता.मात्र माजगाव येथे हा व्यवसाय बंद झाल्यामुळे येथील शेतकरी बांधवांच्या उत्पनांस खीळ बसल्याचे मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे.
माजगाव येथील शेतकरी वर्गांनी आपल्या जमिनी मत्स्य पाळणंसाठी देण्यांत आल्या होत्या,या माध्यमातून त्यांस रोजगार ही उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्या रोजगारांचा प्रश्न मार्गी लागत होत.मात्र हा व्यवसाय बंद झाला आणि येथील शेतकरी बांधवांस उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.मात्र या ठिकाणी मत्स्य व्यवसाय सुरु व्हावे असे येथिल शेतकरी वर्गांची मागणी आहे.मात्र हा व्यवसाय बंद झाल्यामुळे अर्थिक बजेट कोलमडले असल्यांचे शेतकरी वर्गांचे म्हणणे आहे.
तालुक्याच्या ठिकाणी मंगरुळ मासे सुरु असतांना मात्र माजगांव येथे सुरु झाल्यांस जल प्रदुषण होते.मात्र तालुक्याच्या ठिकाणी सुरु असलेले मंगरुळ माश्या चे जल प्रदुषण होत नाही.का ? मात्र हप्ता दिल्यांस की सुरु राहतात.असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. मग हा मत भेद का,जिथे सुरु आहे तेथे हप्ते दिले जाते.यांना कुणांच्या वरद हस्ताने सुरु आहे.ते आम्हास माहित आहे. या परिसरातील असलेल्या थरमॅक्स कारखाने विषयी वेठीत धरण्यांचे काम सध्या सुरु आहे.
मात्र हा कारखाना बंद झाल्यांस येथिल स्थानिक कामगारांवर उपासमारीची वेळ निर्माण होइल,मात्र हा अट्टाहास फक्त स्वताची खळगी भरण्यांसाठी हप्तासाठी हा उठाठेव सुरु असून मात्र त्यांचा हा उद्देश पुर्ण होवून देणार नाही.आश्या दलालगिरी करण्यांस योग्य वेळ आल्यांस आम्ही उत्तर देवू कारण ,शेतकरी, कामगार माझ्या पाठीशी आहे. अशी भावना गृप ग्राम पंचायत माजगांव मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी व्यक्त केला.
0 Comments