के.एम.सी. महाविद्यालयाच्या जिव्हाळा ग्रुपचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ७ एप्रिल,
के.टी. एस.पी.मंडळाचे के.एम.सी.महाविद्यालय तृतीय वर्ष कला शाखा सन १९८४-८५ या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकतेच स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले.३८ वर्षानंतर महाविद्यालयात एकत्र आल्याने विद्यार्थ्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
यावेळी सकाळपासून सर्व वर्गमित्र, मैत्रीणी , वेगवेगळया ठिकाणाहून वर्गमित्र एकत्र आले होते.या स्नेहसंमेलनाकरिता प्राचार्य युवराज महाजन , विद्यमान प्राचार्य - प्रताप पाटील , उपाध्यक्ष - दिलीप पोरवाल , उपप्राचार्य - आण्णासाहेब साहेब कोरे , कार्यालय अधीक्षक- सौ.गीता नाईक , लॅब असिस्टंट- बाळकृष्ण कालेकर ( महाराज) आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित राहीली.
सुरुवातीला सर्वांनी एकत्र आल्यानंतर चहा, नाष्टा करून कॉलेजच्या इमारतींना भेटी दिल्या. नंतर हास्य -विनोद करत गीत गात, तर अनेकांनी आयुष्यातील अनुभव कथन करत सर्वांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला.जिव्हाळा ग्रुपची आठवण रहावी म्हणून एक वडाचे झाड लावण्यात आले महाविद्यालयाला भेट वस्तू देऊन दिवसभर उत्साही वातावरणात आनंद देणारा हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा प्रकारे आनंदाची शिदोरी बांधून संपन्न झाला.
0 Comments