मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात....

 मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात....



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १० मे,

मुंबई पुणे एक्सप्रेस आज पहाटे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 9 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
            मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबई कडे ट्रक क्रमांक (KA 56-3277) हा पाईप घेऊन जात असताना तो बोरघाटात भरधाव वेगात आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पो क्रमांक (MH 03 CP 2428) ला, आणि ओम्नी कार क्रमांक (MH11 y 7832) या दोन वाहनांना जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात ओम्नी कार मधील दोन जणांचा मृत्यू तर ट्रक मधील एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर कार मधील दोन प्रवाशी गंभीर, एक किरकोळ, टेम्पो मधील दोन प्रवाशी गंभीर, दोन किरकोळ, तर ट्रक मधील दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत, या अपघातात एकूण 3 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर तर 4 किरकोळ जखमी झाले आहेत त्याच्यावर एमजीएम येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
          3 जणांचा मृत्यू तर 4 प्रवाशी गंभीर, 4 किरकोळ जखमी या अपघातात माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आयआरबी टीम, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत यंत्रणा, पेट्रोलिंग टीम, आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातात कार ट्रक, आणि टेम्पो मधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघात ग्रस्त वाहने काही काळानंतर बाजूला घेऊन एक्सप्रेसवे वाहतूकसाठी चालू कारण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर