चौक मध्ये महाविकास आघाडीने संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ केले मोठे शक्तिप्रदर्शन

 चौक मध्ये महाविकास आघाडीने संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ केले मोठे शक्तिप्रदर्शन



पाताळगंगा न्युज : समाधान  दिसले
चौक : १० मे,

          महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना दिवसेंदिवस अधिकच लोकप्रियता मिळू लागल्याने अनेक जण महाविकास आघाडीला पसंती देत आहेत. तर मावळातील गद्दारी गाडण्यासाठी मतदार राजा आता सज्ज झाला असता चौकमध्ये महाविकास आघाडीने संजोग वाघेरेच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार बारणे यांच्या भुवया या शक्ती प्रदर्शनाने उंचावल्या आहेत.
                   मावळ लोकसभा मतदारसंघात झालेली गद्दारी गाडण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी - कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत संजोग वाघेरे यांचा प्रचार करत असताना मतदार राजाकडूनही संजोग वाघेरे यांना अधिक पसंती मिळत असून मावळ मधील जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेत गद्दार खासदारालां घरचा रस्ता दाखवण्याचा जणू निर्धारच केल्याचे पाहायला मिळत असून संजोग वगैरे यांना मतदारराजाकडून मिळत असलेला मानसन्मान पाहता महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले. तर चौक मध्ये महाविकास आघाडीने संजू वगैरे यच्या प्रचारार्थ रॅली काढली असता या रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाल्याने मिंदेचे खासदार बारणेंनी या रॅलीचा धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे तर महाविकास आघाडीने चौकमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे.
               यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, शिवसेनेच्या महिला नेत्या आयोध्या पोल, शेकापचे प्रीतम म्हात्रे, शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, रघुनाथ पाटील, आपचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, जि.प.स.मोतीराम ठोंबरे, पं.स.माजी उपसभापती श्याम साळवी, शिवसेनेचे नवीन घाटवल, एकनाथ मते, पप्पू विचारे, सचिन मते, विष्णू जांभळे, विनायक देशमुख, जगदीश हातमोडे, मनोहर देशमुख, उत्तम भोईर, तुळशीराम पाटील, सुनील थोरवे, सुनील गायकवाड, संदीप जाधव, शेकापचे किशोर पाटील, संतोष पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी - कार्यकर्ते व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर