कु क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिची युरोप येथील रोमानिया देशात कुस्ती खेळात फॉरेन एक्सपोजरसाठी निवड
पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : ११ मे,
भारतीय खेल प्राधिकरणच्या वतीने फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तरप्रदेश येथील लखनऊ येथे दि ७ मे रोजी संपन्न झाली. या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेल प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला होता. या आयोजनातून अंतिमतः १२ महिला कुस्तीपटू निवडण्यात आले असून त्याना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठविण्यात येणार आहे. अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कु क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने ५० ते ५४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
क्षितिजा ही कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल - खोपोली येथे सराव करत असताना खेल प्राधिकरणाच्या एसएआय कांदिवली - मुंबई येथे सराव केंद्रात तीची निवड झाली होती.आणि तेथूनच आता तीची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाली.
तीला मार्गदर्शन आणी प्रशिक्षक करणारे राजाराम कुंभार, महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांजळे, विजय चव्हाण, दिवेश पालांडे, ओमकार निंबळे, रोशनी परदेशी आणि कार्मेल कॉन्व्हेंट खोपोलीच्या प्रिंसिपल लीली पॉल आणि खालापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी तीला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पै मारुती आडकर, खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर यांनी क्षितिजाचे विशेष कौतुक केले आहे.
0 Comments