कोपरी ते आसरोटी रस्त्यांचे क्रॉक्रेटीकरण ,पर्यायी मार्गाच्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
चौक : ११ मे,
आज रस्त्यांचे स्वरूप बदलत चालले असतांना ,रस्ते उत्तम होत आहे.मात्र यासाठी पर्यायी मार्ग हा वाहन चालकांस दिला जातो, मात्र हा रस्ता अनेकांसाठी डोके दुखी ठरत आहे.लोहप चौक या मार्गावर सातत्याने वाहनांची रेलचेल असते,यामुळे या रस्त्यांचे काम सध्या सुरु,मात्र या कोपरी ते आसरोटी येथील अंतर साधारणपणे एक कि.मी माळरानावरून रस्ता करून दिला असला तरी सुद्धा वाहनांच्या मुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असल्यामुळे श्वसनांचे त्रास होण्यांची समस्यां गंभीर बनत आहे, हवेत सातत्याने धूळ निर्माण होऊन समोरील वाहन दिसत नाही. यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत आह.मात्र रात्रीच्या वेळी अपघाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तातपुरता बनविलेला रस्ता उत्तम दर्जाचा नाही,फक्त प्रवासी वर्गांची समजूत काढावी या दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आला आहे.काही ठिकाणी चढण,तर काही ठिकाणी तीव्र उतरण त्यांच बरोबर खाच खड्डे असा मार्ग तयार करून दिल्यामुळे या मार्गवर नित्यनेमाने प्रवास करणारे कामगार,शेतकरी,वयोवृद्ध,तसेच आजारी व्यक्तींना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मागील दोन आठवड्यापासून या ठिकाणी या रस्त्यांचे क्रॉक्रेटीकरण सुरु असल्यांचे समजते.यामुळे ,अनेकांना या पर्यायी मार्गांचा वापर करून धुळीचा सामना करावा लागत आहे,या ठिकाणी वाहन जात असतांना धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करू की नये? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे.मात्र दुसरा पर्याय नसल्यामुळे याच मार्गाचा अवलंब केला जातो,परिणामी उत्तम रस्ते पूर्ण झाल्याशिवाय पर्याय नसल्याने ह्याच मार्गावरून प्रवास केला जात असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता प्रवासी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
0 Comments