आपचे डॉ.शेखर जांभळे यांच्या कल्पक प्रचाराची सर्वत्र चर्चा,काकालां सांगा व इतर घोषणाबाजीने मशालचा प्रचार तुफान जोरात...
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ११ मे,
मावळ मतदारसघांत इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षीय नेते व कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत.गावागावात सभा,बैठका यांनी जोर पकडला आहे. शिवसेना (उबाठा गट),काँग्रेस (I), राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) ,शेतकरी कामगार पक्ष,आम आदमी पार्टी हे जोमाने प्रचार करीत आहेत.
आपल्या नवनवीन युक्ती साठी प्रसिद्ध असणारे आम आदमी पार्टी चे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी उत्साही व कल्पक घोषणांनी मशाल निशाणीचा प्रचार सर्वत्र व्ह्यायरल होत आहे.खुद्द उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी सुद्धा या प्रचारासाठी डॉ.शेखर जांभळे यांचे कौतुक केलेले आहे.
काकाला सांगा, मामाला सांगा,दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या नातीगोती, आडनावे,व्यक्ती यांच्या माध्यमातून होत असलेला प्रचार हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या उर्जादायी घोषणांनी प्रचारात उत्साह निर्माण होत आहे.फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमावर देखील कौतुकाचे सुर उमटत आहे.मराठी व हिंदीत असणाऱ्या घोषणांनी मावळ मतदारसंघात मशाल निशाणीच्या प्रचारात जोर पकडला आहे.
0 Comments