टायकून ऑफ इशिया या संस्थेनी महेश निमणे यांस पुरस्कारांने सन्मानित

 टायकून ऑफ इशिया या संस्थेनी महेश निमणे यांस पुरस्कारांने सन्मानित 






पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : १३ मे,

           तरुण वर्गांनी आपला व्यवसाय करीत या मध्ये अग्रेसर व्हावे यासाठी ही संस्था सातत्याने प्रोत्साहन करीत असते.यासाठी ही संस्था पुरस्कारांचे आयोजन करीत असते.या वर्षी  इनराईज सयाजी नाशिक या स्टार हॉटेल आयोजन करण्यांत आले होते.खोपोली येथिल महेश निमणे यांच्या सुखी वास्तु स्पिरिच्यूअल सर्व्हिसेस या अध्यात्मिक संस्थेला टायकून ऑफ महाराष्ट्र पुरस्कार ने मराठी सिनेतारका ऋता दुर्गुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यांत आले.शाळ,श्रीफळ,सन्मानचिन्ह,असे या पुरस्कारांचे स्वरुप होते.
              गेल्या दिड महिन्यांपासून टायकून ऑफ एशिया ही नवीन उद्योग प्रोत्साहित करणारी नामवंत संस्था महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पुरस्कार प्रदान करीत असतांना रायगड जिल्ह्यातून खोपोली शहरात तसेच संपुर्ण महाराष्ट्रभर कमी खर्चात वास्तुदोष निवारण पद्धती, अंकशास्त्र कुंडली यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात नैसर्गिक पद्धतीने उपाययोजना देणारी संस्था म्हणून सुप्रसिद्ध असल्यामुळे तीची दखल या संस्थेनी घेतली. 
            महेश निमणे वास्तुदोष निवारण च्या व्यतिरिक्त व्यवसाय कसे कारावे यासाठी त्यांनी व्यवसाय विक्री  १०१ उपाय हे पुस्तक लिहून नविन व्यवसायिकांच्या हातात देवून त्यांच्या मध्ये चैतन्य निर्माण करण्यांचे काम केले.त्याच बरोबर विविध उपक्रम राबविण्यांचे काम करीत आहे.रक्तदान,शिबीर,भजन,तबला वादक,असे अनेक नवनविन उपक्रम हाती घेत आहे.एक व्यवसायिक ते आध्यामिक काम करीत असल्यामुळे या संस्थेने  दखल घेवून पुरस्कार दिल्याबद्द्ल महेश निमणे यांचे सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर