हॉटेल व्यवसायाच्या इर्षेतून गळा दाबून खून,आरोपींना खालापूर पोलीसांनी २४ तासात केले अटक
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापुर : १३ मे,
भानुदास भिवा चौधरी हे कलोते फाटा येथे वडापाव चहा विक्रिचा व्यवसाय करीत होते.मात्र त्याच ठिकाणी नितेश पाटील यांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या मध्ये व्यवसायिक चुरस निर्माण होत.यामुळे आपला व्यवसाय ला वडापाव चे दुकान अडथळा निर्माण होत असल्यामुळे चौधरी यांचा गळा दाबून हत्या करण्यांत आली.तसेच त्यांचा मृतदेह या हॉटेल च्या पाठीमागे महेश भंडारी यांच्या शेतामध्ये असलेल्या उंबराच्या झाडाखाली टाकण्यांत आले.मात्र पोलीसांनी गोपनीय माहिती घेवून आरोपीस २४ तासाच्या आत अटक करण्यांत आले.
मिळालेल्या सुत्राच्या माहिती नुसार की भानुदास भिवा चौधरी हे कलोते फाट्यावर वडापाव चहा चे दुकान होते,नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन घरी जात असतांना त्या दिवशी हॉटेल मध्ये झोपण्यांचा निर्णय घेतला.मात्र ह्यांची माहिती आरोपीस कळताच त्यांचा सहकारी मारुफ उर्फ मेहबुब हसमत अली, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या कलोते राहत असून ह्या दोघांनी संगणमत करुन ह चौधरी यांचा गळा दाबून त्यास जिवेठार मारले.पोलीसांनी गोपीनीय माहिती घेवून आरोपी पर्यंत पोहचून त्यांस पोलीसी खाक्या दाखविताच,आपण खुन केल्यांचा गुन्हा कबुल केले.
सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद खोपडे, पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे, सपोनि मनिष मोरे, सपोनि सुर्यवंशी, पोउनि/आरोटे, मपोउनि/सरीता मनवर, पोउनि रोहिदास भोर, पोउनि/शिवाजी जुंदरे, सहा. फौजदार सुभाष म्हात्रे, पोलीस हवालदार रतन बागुल, नितीन शेडगे, निलेश कांबळे, अमित सावंत, विशाल शिंदे, हेमंत कोकाटे, शरद फररांदे, रणजीत खराडे, मनोज सिरतार, चंद्रकांत पयेर, आशिष पाटील, महिला पोलीस हवालदार हेमा कराळे, अंकिता चिंबुळकर, प्रतिक्षा म्हात्रे, दिक्षा पवार यांनी महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
0 Comments