दिपोत्सवाच्या माध्यमातून वारद येथिल अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव ची सांगता

 दिपोत्सवाच्या माध्यमातून वारद येथिल अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव ची सांगता 



काशिनाथ जाधव : प्रतिनिधी  
पाताळगंगा  : १४  मे 

           रायगड भूषण,गुरुवर्य ह.भ.प. रामदास ( भाई ) महाराज पाटील यांच्या प्रेरणेने व ह.भ.प.हनुमंत लभडे यांच्या संकल्पनेतून,ज्ञानेश्वर महाराज पाटील (खानाव )यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षी अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव निमित्ताने ग्रामस्थ,या परिसरातील भाविकांच्या माध्यमातून वारद येथे अखंड ज्ञान,जप यज्ञ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दिपोत्सवाच्या माध्यमातून सांगता करण्यात आली.ह्या सोहळ्यांचे तिसरे वर्ष असून रोज नित्यनेमाने काकडा,भजन,प्रवचन सामुदायिक पारायण,तसेच किर्तनांचे आयोजन करण्यात येत होते.
             

ग्रामस्थ,महिला मंडळ,तरुण वर्ग, हा 
यज्ञोत्सव उत्साहाने आणि भक्ती भावने साजरा करण्यात येत होता.ह.भ.प. रामदास ( भाई ) महाराज पाटील,ह.भ.प.अनंत महाराज कार्ले,ह.भ.प.पांडुरंग महाराज पाटील,गृप.ग्राम पचायत माजगांव सरपंच दिपाली पाटील,सदस्य - शशिकांत पाटील,मराठा अध्यक्ष - उत्तमशेठ भोईर,नरेश पाटील,मंगेश पाटील,यांच्या शुभहस्ते दीपोत्सव करण्यात आले.यावेळी सामाजिक,सांस्कृतीक,शैक्षणिक, राजकिय अशा विविध क्षेत्रातील  मान्यवर व्यक्ती आणि वारकरी संप्रदाय येथील थोर कीर्तनकार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी  दीप प्रज्योलीत करून आणि ज्ञानेश्वराच्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
             




गेले तीन दिवस अखंड,भजन,क़िर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले.दीपोत्सवाच्या दिवशी महिला वर्गांनी हातात निरंजन चे ताट हातात घेवून उभे असल्यांचे दृश्य पहावयांस मिळाले,तसेच काल्यांचे किर्तन  रायगड भूषण,गुरुवर्य ह.भ.प. रामदास ( भाई ) महाराज पाटील महाराज यांचे झाले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर