नदीत बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १४ मे,
मोरबे धरणाची उपनदी असलेल्या धावरी नदीत दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण जांभिवली गावात दुःखाची सावट पसरली आहे.
आज सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास कुमारी आराध्या संजय गावडे वय वर्ष साधारण पाच वर्षे व आरव विजय गावडे वय वर्ष अंदाजे पाच वर्षे ह्या दोन सख्ख्या चुलत भावा बहिणीचा धावरि नदीत बुडून मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक, मित्र परिवार,ग्रामस्थ यांच्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळी आपली आई काकी हिच्या बरोबर नेहमी प्रमाणे नदीवर कपडे धुण्यास गेले होते, आई काकी कपडे धूत असताना या दोघांनी पाण्यात अंघोळ केली, कपडे धुवून झाल्यावर आई काकी सोबत घरी आले, काही वेळानी ते घरी किंवा शेजारी, अथवा कुठे खेळत नसल्याचे दिसल्यावर शोध सुरु झाला,त्यावेळी ते पुन्हा नदीवर गेले का? ही शंका आल्याने नदीवर जाऊन पाहणी केली असता कुमारी आराध्या ही पाण्यावर तरंगत असताना दिसली, लागलीच आरव चा शोध पाण्यात घेतला असता, तो पाण्यात चिखलात अडकल्याचे निदर्शनास आले.दोघानाही चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
ही दुर्दैवी घटना समजताच परिसरातील नातेवाईक, मित्र परिवार,ग्रामस्थ यांच्यात हळहळ व्यक्त होत होती, दोघेही निरागस बालकांचा मृत्यू झाल्याने घरातील वातावरण शोकात बुडाले आहे. ही नदी अतीशय घातकी असून खोल आहे, नदीच्या दोन्ही बाजूला उतार असून सर्व भाग खडकाळ आहे.चौक चे सपोनि. युवराज सुर्यवंशी वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.
0 Comments