घाटकोपर दुर्घटनेनंतर खोपोली पालिका प्रशासन अलर्ट!

 घाटकोपर दुर्घटनेनंतर खोपोली पालिका प्रशासन अलर्ट!  



पाताळगंगा न्युज : जयवंत माडपे 
खोपोली : १६ मे,


                     घाटकोपर मुंबई येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर खोपोली पालिका प्रशासन अलर्ट झाली आहे. यांसंदर्भात मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी तातडीची बैठक आयोजित करून सदर विषयावर गांभीर्याने चर्चा केली. 
               मान्सून पूर्व कालावधीत व अन्य कालावधीत दुर्घटनांमुळे जीवितहानी टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून नैसर्गिक आपत्ती समयी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला थांबू नये ,असे आवाहन खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंकज पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे नागरिकांना आवाहन केले आहे. 
            नागरिकांनी रस्त्यावर चालताना काळजी घ्यावी असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान खोपोली शहरातील जाहीर फलकांबाबत प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले असून,अनधिकृत फलक आढळल्यास त्याच्यावर कारवाई गवकरण्यात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण