साप्ताहिक जागृत रायगडचा वर्धापन दिन थाटात साजरा वंचितांना धान्य व साड्यांचे वाटप करुन निर्माण केला आदर्श

 साप्ताहिक जागृत रायगडचा वर्धापन दिन साजरा,अदिवासी बांधवांस जिवनावश्यक वस्तुचे वाटप  





समाजामध्ये काम करत असताना  शेवटच्या घटकापर्यंत पोहचल पाहीजे हीच आमदार महेंद्रशेठ थोरवेंची शिकवण - राजू गायकवाड  

जागृत रायगड या नावा प्रमाणेच नागरी समस्यांबाबत खोनपा प्रशासनाला जागृत करत आहेत --  किशोर पानसरे 

   

पाताळगंगा न्युज : किशोर साळुंखे 
खोपोली : १६ मे, 
 
                रायगड जिल्ह्यात प्रसिध्द होणार्या साप्ताहिक जागृत रायगड या नियतकालीकेचा १९ वा वर्धापन दिन खोपोली नगरीत मोठ्या थाटात साजरा झाला असून  वर्धापन दिनानिमित्त समाजातील वंचित घटकांमध्ये धान्य व साड्यांचे वाटप करुन समाजात अनोखा आदर्श निर्माण केला.रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरीतून किशोर साळुंके यांनी महाविद्यालयीन काळात शिक्षण घेत असताना सन २००५  मध्ये साप्ताहिक जागृत रायगड नावाचे नियतकालीक सूरु केले.
          आज या साप्ताहिक वृत्तपत्रे यांस १९ वर्षाच्या प्रदार्पण करीत असतांना या माध्यमातून समाजातील अनेक समस्या शासनदरबारी मांडून त्यावर यशस्वीरीत्या कार्यवाही झाल्याचे पाहाण्यात आले.अनेकांना या साप्ताहिकाच्या बातम्यांमधून न्याय मिळाल्याने त्यांचे समाधान झाले.नागरीकां पर्यंत यथोचीत बातमी पुरविण्याचे काम साप्ताहिक जागृत रायगड ने केले आहे.
             नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणा-या  साप्ताहिक जागृत रायगडला १९ वर्ष पूर्ण झाली असुन,आपल्या साप्ताहिकाला यशस्वी वाटचालीत आशिर्वाद देणार्यांच्या सहकार्याने संपादक किशोर साळुंके कोणताही बडेजाव न करता समाजातील वंचित घटक असणा-या आदिवासी , वाडीत जावून सामाजिक उपक्रम राबविण्याचा उपक्रम निर्णय घेतला.या प्रमाणे खोपोली शहरातील प.पु.गगनगिरी आश्रमा शेजारील आदिवासी वाडी मधील नागरिकांना धान्य व साडीचे वाटप करण्यात आले.
             सदर कार्यक्रमा प्रसंगी खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड , माजी नगरसेवक किशोर पानसरे, आम आदमी पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे, डाॕ.कटकदौंड यांनी आपली मते मांडताना साप्ताहिक जागृत रायगड च्या यशस्वी १९ वर्षाच्या वाटचालीबाबत कौतुक व्यक्त करित धान्य व साड्या वाटप उपक्रमाचे कौतूक करताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या समयी खोनपाचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड , खोनपाचे माजी नगरसेवक किशोर पानसरे , आप चे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे , डाॕ, कटकदौंड ,धोत्रे, जयवंत वाघ , प्रविण कोल्हे, सा. जागृत रायगड खोपोली शहर प्रतिनिधी सुजाता यादव , पत्रकार सचिन यादव व इतर मान्यवर उपस्थितीत होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  दानशूर व्यक्ति  , संस्था , राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे साप्ताहिक जागृत रायगड चे संपादक किशोर साळुंके यांनी मानले आभार.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण