अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने घेतली भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी,

 वीज पडून राज उर्फ जगु मृत्यू,

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने घेतली भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी,

समाजसेवक प्रवीणजी काकडे यांनी दिला कटूंबाला मदतीचा हात 



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २० मे,


             माण तालुक्यातील मरगळेवाडी  येथील राज उर्फ जगु म्हाकु मरगळे हा रोजंदारीवर कामाला गेला असता त्याच्यावर वीज पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.
             सामाजिक बांधिलकी जपत अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने राजचे कुटुंबियांना  दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करत त्यांच्या दोन्ही भावाचा शैक्षणिक खर्च  ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी यांच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन काकडे यांनी कुटूंबियांना दिले आहे.
              राजच वय वर्षे फक्त १४ वडील गेलीं ८ वर्षे झाली पॅरलिस मुळं बेडवर पडुन आहेत.राज सर्वात मोठा मुलगा आहे.वडीलांचे आजारपणामुळे राज आणि आई दोघेही दररोज रोजंदारीवर कामाला जाऊन दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी धडपड करायचं त्यातच  राज शाळेला सुट्टी मिळाली आहे.तेव्हा पासून कामाला जायचा परंतु  गुरुवारी  कामाला गेला होता त्याच शेतात वीज पडून मृत्यूमुखी पडला.आणि त्यांच्या कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला या कुटुंबावर नियतीने घाला घातला आई ला हातभार लावण्यासाठी राज नेहमीच सहकार्य करायचा लहान वयात राज वर वडीलांच्या आजार पणामुळ जबाबदारी पडली होती त्याला शिक्षण पुर्ण करुन सैन्य भरती होऊन देशाची आणि समाजाची सेवा करायचं आहे असं बोलायचं दोन्ही लहान भावांना शिक्षण द्यायचं होतं परंतु राजला अवकाळी पावसाने विजेने मृत्यूमुखी पाडले. 
            कुटुंब अस्ताव्यस्त झाले अशा या कुटुंबाला आधार देऊन  मानसिक बळ दिले पाहिजे तरच समाजाचा विकास होईल यावेळी मदत देतान  सांगितले. Mयावेळी प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व सुखदेव लाडे,लाडेवाडी प्रा.हणमंतराव घुटुगडे, मनीषा मरगळे, नाना मरगळे, भाऊ अभय,निलेश पोपटराव शिंगाडे, संतोष कारंडे, विकास कारंडे, बापू मरगळे,हिराप्पा शिंगाडे, कुबेर मरगळे, धोंडीराम शिंगाडे, मरगळवाडी  येथे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर