खंडाळा बॅटरी हिल जवळ भीषण अपघात,तीव्र वळणावर कंटेनर कार वर पलटी,दोन जण ठार तर सह जखमी

 खंडाळा बॅटरी हिल जवळ भीषण अपघात,तीव्र वळणावर कंटेनर कार वर पलटी,दोन जण ठार तर सह जखमी 




पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २१ मे,

               मुंबई -पुणे जुन्या महामार्गांवर खंडाळा राजमाची पॉईंड येथील बॅटरी हिल गावाजवळील तीव्र उतारावर वळणावर कंटेनर कार वर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला,या अपघातात कार मधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत.
             जुन्या महामार्गवरून लोणावळा हुन मुंबई कडे हा कंटेनर क्रमांक ( एम एच १४  एफ टी १४४५ ) हा जातं असताना तो बॅटरी हिल जवळील  तीव्र वळणावर आला असता लोणावळा कडे जाणाऱ्या कार क्रमांक (एम.एच १४  बी एक्स १६०५ ) वर पलटी झाला. ही कार अलिबाग वरून तळेगाव येथे जातं असतांना, या कार मध्ये तळेगाव येथील चौधरी कुटूंबातील आठ जण प्रवास करत होते,अपघात झाला.
             यामध्ये कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश चौधरी( वय ४०  )जान्हवी योगेश चौधरी (वय ३१ ) दीपाशा योगेश चौधरी (वय ९ )जिगीक्षा योगेश चौधरी (वय १.५ ) मितांश दत्तात्रय चौधरी, (वय ९  )भूमिका दत्तात्रय चौधरी (वय १६  )हे सहा जण किरकोळ जखमी झाले,असून सर्व जखमीना जवळच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण