श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा घोडीवली गावात संपन्न

 श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा घोडीवली गावात संपन्न



पाताळगंगा न्युज : नवज्योत पिंगळे 
खालापुर : ८ मे,


          खालापूर तालुक्यातील ग्रामीण घोडीवली गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभल्याने वर्षभर गावात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम पार पडत असताना शनिवारी ६ मे रोजी श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा वै.वा.ह.भ.प.नामदेव गंगाराम पालांडे यांच्या आशिर्वादाने व गुरुवर्य ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक यांच्या कुशल मार्गदर्शनाने तसेच हरिनामाच्या गजराने ग्रामीण घोडीवली गावात संपन्न झाले
            घोडीवली गावात श्री साईबाबा मंदिर २२  वा वर्धापन दिन सोहळा सोमवार ६  मे रोजी मोठ्या आनंदाने व हरिनामाच्या गजराने संपन्न गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले असताना या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पहाटे ४  वाजता श्री ची दैनंदिन आरती - भारत पालांडे यांच्या शुभहस्ते, पहाटे ४  वाजून ३०  मिनिट ते ६  वाजेपर्यंत काकड आरती - सोमजाईमाता एकादशी मंडळ व बाळ गोपिका हरिपाठ मंडळ यांचे, सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत श्री गणेश पुजन व साई महाअभिषेक - मेघना व मंगेश वामन भोसले यांच्या शुभहस्ते, सकाळी १०  वाजता श्री सत्यनारायण महापुजा - केतकी कृष्णा पवार यांच्या शुभहस्ते, करण्यांत आली.

             दुपारी १२  वाजता साईची महाआरती - सुरेश विठ्ठल पिंगळे माझी सैनिक यांच्या शुभहस्ते, दुपारी १  ते २ वाजेपर्यंत साईभंडारा -  पंचायत समिती सदस्य अक्षय हनुमंत पिंगळे श्री समर्थ साई मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळी घोडीवली कांढरोली यांच्या तर्फे, दुपारी ३  ते ४  सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी ४  ते ६  वाजेपर्यंत श्री साईबाबा पालखी सोहळा - उघ्दाटक राजेंद्र हळुराम भोसले , सायंकाळी ७  वाजता साईची महाआरती - एकनाथ पांडुरंग पिंगळे तालुका प्रमुख शिवसेना भंडारा - श्री नागेश दामू मेडेकर अध्यक्ष साबाई माता मंडळ व श्री समर्थ साई मित्र मंडळ यांच्या तर्फे तसेच रात्री ८ नंतर हरिभजन - श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ धामणी गायक निकेश लोते धार्मिक कार्यक्रम पार पडल्याने गावकरी मंडळीमध्ये हरिनामाच्या गजराने नवचैतन्य पसरले होते.
            तर हा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी श्री समर्थ साई मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ घोडीवली यांनी मेहनत घेतली होती.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर