वारद येथे अखंड भक्तीरसामृत यज्ञोत्सवाचे आयोजन, ह.भ.प. हनुमंत विष्णू लभडे यांचा संकल्पनेतून

 वारद येथे अखंड भक्तीरसामृत यज्ञोत्सवाचे आयोजन, ह.भ.प. हनुमंत विष्णू लभडे यांचा संकल्पनेतून





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
वारद : ८  मे , 
                       
              रायगड भूषण ,गुरुवर्य ह.भ.प. रामदास ( भाई ) महाराज पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली ह.भ.प.हनुमंत विष्णू लभडे यांच्या संकल्पनेतून तृतीय वर्षी अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव आयोजन वारद येथे करण्यात येणार आहे.सदर या कार्यक्रमास वारकरी,सामाजिक सांस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय,शासकीय कर्मचारी या ठिकाणी यज्ञोत्सव उपस्थिती राहणार असल्याचे समजते.
                  पाहटेपासून या ठिकाणी भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून सकाळी काकडा आरती,ज्ञानेश्वरी पारायण,भजनां,प्रवचन,हरिपाठ,कीर्तन,जागर भजन अदि कार्यक्रम या यज्ञोत्सवाच्या ठिकाणी होणार आहे.तसेच या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार यांचे कीर्तन  रोज रात्री ९ ते ११ कीर्तन होणार आहेत.  
             पहिल्या दिवशी प्रवचन  १२ मे रोजी  ह.भ.प. जयेश महाराज पाटील (वडगांव ) तसेच किर्तन ह.भ.प.उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी (अध्यापक - जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, १३ मे  रोजी  प्रवचन ह.भ.प.अक्षय महाराज चव्हाण (गुरुकुल महड तसेच ह.भ.प.अशोक महाराज जाधव (पुणे )यांचे कीर्तन होणार आहे.,सोमवार १३ मे रोजी दीपोत्सवाच्या माध्यमातून या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.काल्यांचे कीर्तन १४ मे रोजी गुरुवर्य - ह.भ.प.रामदास (भाई )महाराज पाटील गुरुकुल - महड ) यांचे होणार आहे.
                ह्या कार्यक्रमाचे आयोजन हनुमंत विष्णू लभडे यांच्या संकल्पनेतून व ज्ञानेश्वर महाराज पाटील (खानाव )यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या कार्यक्रमास ग्रामस्थ,महिला व तरूण मंडळ वारद यांच्या सहकार्य लाभले आहे. 
                       
           

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर