पाणी प्रश्नावरून खालापूरचे ग्रामस्थ आक्रमक..
खालापूर नगरपंचायत ने न्याय न दिल्यास येणाऱ्या लोकसभा मतदानावर ग्रामस्थ टाकणार बहिष्कार व आगामी काळात आमरण उपोषण करणात
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ८ मे,
नाव मोठ लक्षण खोटं अशी परिस्थिती खालापूर नगरपंचायत प्रशासन व सत्ताधारी यांची दिसून येत असून खालापूर नगरपंचायत मधील पाणी प्रश्न हा कित्येक वर्षे ऐरणीवर आहे. अनेक दिग्गज मंडळी खालापूर नगरपंचायत मध्ये असून कोणाकडूनही पाणी प्रश्न आजवर सुटला जात नाहीं ही खालापूर वासियांसाठी मोठी खेदाची गोष्ट आहे.मात्र पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर येणाऱ्या लोकसभा मतदानावर ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असून,आगामी काळात आमरण उपोषण करणार असल्यांचे निवेदन दिले.
अपुरा पाणी पुरवठा सह दैनंदिन समस्यांना त्रासलेले खालापूर शहरातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून नगरपंचायत व तहसील कार्यालयाला धडक देत देत समस्या सोडवा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. खालापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग ७ मध्ये आपुरा पाणी पुरवठा होतं असल्याने नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात तक्रार केली होती. तक्रारी नंतर २५ एप्रिल रोजी प्रभाग ७ मधील नागरिकांची नगरपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. परंतु त्यावर नगरपंचायत कडून कोणत्याही प्रकारची कारवाही होतं नसल्याने आज पाटील आळीमधील ग्रामस्थ आक्रमक होत खालापूर नगरपंचायत प्रशासन व तहसील प्रशासन यांना निवेदन देत पाणी प्रश्न लवकर सोडवा अशी मागणी केली आहे. खालापूर नगरपंचायत हद्दीतील पाटील आळीमधील जुन्या असलेल्या नळ कनेक्शन वरून नवीन नळ जोडणी देऊ नये अशी मागणी पाटील आळीमधील ग्रामस्थ यांनी केली आहे व योग्य तो न्याय न दिल्यास आगामी काळात होतं असलेल्या लोकसभा निवणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा दिला आहे तसेच आगामी काळात आमरण उपोषनाचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे. ह्यावेळी वैभव भोईर, मिलिंद पाटील, मारुती तटकरे, नंदा भोसले, मिलिंद भोसले, जयेश पाटील,बाळा पाटील, नयना म्हात्रे,मनीषा कदम,लता पाटील, मंगल पिंगळे, प्रचिती साखरे, राजश्री म्हात्रे व प्रगती किरकिंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments