मी मंत्री नसतो तर तर विकास कामे झाली नसती :मंत्री रस्ते,वाहतुक आणी महामार्ग भारत सरकार - नितिन गडकरी
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
चौक : ८ मे,
बीजेपी सत्तेत असल्यापासून मी सातत्याने दळण - वळण यांच्यावरती जास्त भर दिला.यामुळे वेळ आणी इंधनांची बचत होत चालली आहे.आज अनेक ठिकाणी रस्ते उत्तम होत चालली आहे.जे.एन.पी.टी असो अथवा महाराष्ट्रातील विविध मार्ग ,उड्डाण पुल,तसेच बोगदे खोदण्यांचे काम केले.मात्र कॉंग्रेस ने गेल्या साठ वर्षात गरीबीचा हटावाचा नारा दिला मात्र सामन्य मानसांची गरीबी हटली नाही,मात्र बीजेपी यांनी बेरोजगार दिला,तरुणांना रोजगार देण्यांचे काम करीत आहे.मात्र मी मंत्री नसतो तर विकास कामे झाली नसती असे मत,आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन चौक येथे करण्यांत आले यावेळी ते बोलतांना म्हणाले.
सायंकाळी ६: ३० वेळ दिली असतांना मात्र बीजेपी चे नेते रात्री ८ वाजता व्यासपिठावर हजर झाले,सत्कार भाषणे,पक्ष प्रवेश यामुळे या मध्ये खूप वेळ गेला.यामुळे आलेले महिला वर्ग पुरुष नाराजीचा सुर उमठत होते.यामुळे काही महिला पुरुष वर्गांनी घरचा रस्ता धरल्यामुळे खुर्चा रिकाम्या असल्यांचे पहावयांस मिळाले.मात्र तरी सुद्धा येथिल मैदानावर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते चाहते उपस्थित होते.या निवडणूकीत दोन लक्ष ने आप्पा बारणे विजयी होणार असे भाकित उरण चे आमदर महेश बालदि यांनी या जाहिर प्रचार सभेत गौर उदगार काढले.
या कार्यक्रमास मंत्री रस्ते,वाहतुक आणी महामार्ग भारत सरकार - नितिन गडकरी,उद्योग मंत्री ,पालक मंत्री रायगड उदयजी सामंत,आमदार उरण - महेश बालदि,कर्जत खालापुर,आमदार महेंद्र थोरवे,शिवसेनेचे नेते - गजानन्न किर्तीकर,लोकनेते मा.खाजदार - रामशेठ ठाकूर आमदार - प्रशांत ठाकूर,मा.आमदार - देवेंद्र साटम,मा.आमदार सुरेश लाड,आर.पी.आय.जिल्हा अध्यक्ष - नरेंद्र गायकवाड,भाजप जिल्हा अध्यक्ष - अविनाश कोळी,भाजप उ.जिल्हा उपाध्यक्ष - रामदास ठोंबरे,माजगांव माजगांव मा.सरपंच - गोपीनाथ जाधव ,आर.पी. आय - नेते अविनाश कांबळे,तालुका अध्यक्ष - प्रविण मोरे,चौक शहर अध्यक्ष - गणेश कदम,भाजप उ जिल्हा अध्यक्ष - सुधिर ठोंबरे,सरपंच चौक - रितु सुधीर ठोंबरे,रविंद्र कुंभार
0 Comments