पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श तरुणांनी घ्यावा - प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकरांचा आदर्श  तरुणांनी  घ्यावा - प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे 

  


पाताळ्गंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ३ जून,

        धर्मरक्षिनी राजामाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श तरुण  पिढीने घेऊन कारभार करावा असे आवाहन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले आहे,ते शेलू येथील आयोजित  अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात बोलत होते.
               यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी करणाऱ्या मान्यवरांचा  समाजभूषण अहिल्यारत्न,पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिवश्रुष्टि पार्क शेलू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  उत्सव जयंती समिती शेलू, क्षत्रिय धनगर समाज कर्जत  यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जयंती २९९ वी जयंती शेलू येथे  पार पडली.
        यावेळी समाज बांधवाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात  अहिल्यादेवीच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा सकारलेल्या व्यक्तींची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली
       तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी केलेल्या पेन तालूका धनगर समाजाचे अध्यक्ष राजू आखाडे यांना समाज भूषण आणि आदर्श शिक्षक अहिल्यारत्न   पुरस्कार, देण्यात आला तर, कब्बडी क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी केल्यामुळे लक्ष्मण ढेबे, क्रीडा पुरस्कार देण्यात आला तर समाजाच्या अडी अडचणी सोडवून समाजाला न्याय देण्यासाठी अहोरात्र झाटणाऱ्या  दत्तात्रय शेडगे, यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर, बहुजन समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणारे संतोष ठाकूर,  यांना समाजभूषण पुरस्कार, तर उधोगक्षेत्रात श्रीरंग बंडगर, आणि पांडुरंग यमगर, कामगार क्षेत्रात आबासाहेब शामराव पुकळे,  राजकीय क्षेत्रात शिवाजी दातीर, यांना अहिल्यारत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.
             यावेळी ऑल इंडिया धनगर समाज  महासंघाचे  प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, माजी सरपंच तथा समाजसेवक गुरुनाथ शेठ मसणे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष अँड संतोष आखाडे,समाजसेवक परमाणंद  नाचण,   ज्योतिलिंग सामाजिक बहुउदशीय संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पुकळे वैभव यादव बाळासाहेब गुटुगडे , ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे, रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे, पेन तालूका धनगर  समाज अध्यक्ष राजू आखाडे, लक्ष्मण ढेबे,  खालापूर तालूका अध्यक्ष हरेश ढेबे,युवा नेते चंद्रकांत  शिंगाडे नारायण मसणे रामदास मसणे अर्जुन तरे सतिश निमणे सुनील कारंडे मोहन पुकळे निलेश शेठ बनगर सुहास सर पुकळे हरि कारंडे दिलिप पडळकर प्रकाश सुरेश मालंडकर माने तानाजी माने भरत जानकर  राजेश खरात ‌अजय पवार चंद्रकांत चाफे ललित जाधव सुरेश सदावर्ते अनिकेत झेंडे आदिसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर