राजिप शाळा वडगाव मध्ये अवतरली कार्टून नगरी

 राजिप शाळा वडगाव मध्ये अवतरली कार्टून नगरी

 पहिली व नविन  दाखल मुलांच्या स्वागताला छोटा भीम,डोनाल्ड,डक,चुटकी




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वडगांव : १७ जून,
 
    
              रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे पहिलीच्या वर्गामध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पायांचे व हाताचे ठसे एका कागदावर घेवून नाविन्यपुर्ण उपक्रम मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी हाती घेण्यांत आला.तसेच नवि प्रवेश घेणा-ता विद्यार्थ्यांना सन्मानांने शाळेत आण्यांत आले. त्यांच्या स्वागतासाठी छोटा भीम,डोनाल्ड,डक,चुटकी.यांच्या वेषात त्यांचे स्वागत करण्यांत आले.त्याच बरोबर  प्रभात फेरी काढून फुग्यांवर लिहिलेली घोषवाक्ये,पालकांचे लक्ष्य वेधून घेतले जात होते.यावेळी हा परिसर मुलांच्या घोष वाक्यांनी गर्जून गेल्यांचे पहावयांस मिळाले.

           

  शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये होत असलेले बदलामुळे सेमी व इंग्रजी माध्यम सोडून २० पेक्षा ही जास्त विद्यार्थी ह्या शाळेत दाखल झाल्यांचे पहावयांस मिळाले.त्याच बरोबर ह्या शाळेत बर्षभर सातत्याने विविध उपक्रम हाती घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये अमुलाग्र बदल घडत असल्यामुळे या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यांचे निदर्शनास येत आहे. 


        शाळेच्या पहिल्याच दिवशी मा.सरपंच गौरी गडगे,महादेव गडगे यांच्या माध्यमातून मिष्ठान देऊन  मुलांचा पहिला दिवस गोड करण्यांत आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करूणा ठोंबरे,सदस्य शिल्पा जाधव,पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच शिक्षक वैजीनाथ जाधव,सरस्वती कवाद, स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर उपस्थित होते.

चौकट : 
शिक्षणासोबत सामाजिक व वैज्ञानिक व संगणकीय ज्ञान आवश्यक आहे,यासाठी शाळेत अल्कले कंपनी कडून संगणक लॅब तयार करवून घेतली असून लवकरच सर्व मुले कोडिंग व प्रोग्रामिंग चे तसेच MSCIT चे धडे शाळेतच गिरावतील व प्रमाणपत्र प्राप्त करतील.
राजिप शाळा वडगांव मुख्याध्यापक  : सुभाष राठोड

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर