तुषार तानाजी कांबळे यांची आरपीआय सचिव पदी नियुक्ती

 तुषार तानाजी कांबळे यांची आरपीआय सचिव पदी नियुक्ती 



 पाताळगंगा न्यूज : शिवाजी जाधव
खोपोली : १८ जून,

              पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह पुणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ती समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमांमध्ये तुषार तानाजी कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती ऍड एल. टी. सावंत माजी आमदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड व डॉ. सतीश केदारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक ब्रिगेड यांच्या हस्ते करण्यात आली. 
               तुषार कांबळे हे अनेक वर्षापासून आरपीआय मध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्य करीत आहे.तसेच व्यवसाय,महिला, बालविकास, युवा - युवती यांना न्याय मिळवून देण्याकरता कार्य करत आहेत, कांबळे हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात असल्यामुळे
कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ती समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड एल. टी. सावंत मा.आमदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड व स्वागत अध्यक्ष डॉ. सतीश केदारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक ब्रिगेड होते. 
             या कार्यक्रमाचे आयोजन मा. संदिपान साबळे राष्ट्रीय सरचिटणीस, मा. कुमार गवळे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, मा. विष्णू दादा भोसले सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे ऍड एल. टी. सावंत माजी आमदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड, डॉ. सतीश केदारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक ब्रिगेड, श्रीकांत कदम पुणे जिल्हा अध्यक्ष , संघमित्रा ताई गायकवाड सचिव महाराष्ट्र राज्य महिला आघाडी, रोहिदास बापू गायकवाड आरपीआय नेते, गोविंद भाई निकाळजे तालुकाध्यक्ष मुळशी , संतोष डोळस जिल्हाध्यक्ष पुणे श्रमिक ब्रिगेड , खंडू दादा शिंदे सचिव महाराष्ट्र राज्य मातंग आघाडी, कैलास कांबळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मातंग आघाडी, नारायण शिगवण सामाजिक कार्यकर्ते तसेच तुषार दादा कांबळे यांचे सहाय्यक राहुल मंगळे, मित्रपरिवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर