राष्ट्रीय समाज पक्षाच्या 20 व्या वर्धापनदिन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १९ जुलै,
राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून हा वर्धापन दिन सोहळा २९ ऑगस्ट रोजी अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन सोहळ्याला विशेष महत्व आले आहे,
राष्ट्रीय समाज पक्षाला स्थापन होऊन २० वर्ष पूर्ण झाल्याने या पक्षाची महाराष्ट्रात संघटना आणि ताकद प्रत्येक जिल्हात आहे,तर आगामी होणाऱ्या निवडणूका याबाबतही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री, आमदार महादेव जानकर हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत, तर आगामी विधानसभा निवडणूका लढविण्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या वर्धापन दिनाला कोकणातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे, तर राष्ट्रीय समाज पक्ष कोकण विभाग अध्यक्ष श्रीकांत भोईर यांनी केले आहे
0 Comments